खेड भोसे : आपल्या गावच्या शेतकऱ्याचं पोरगं डॉक्टर होणार याचं मोठं अप्रूप असून गावकऱ्यांची छाती अभिमानानं फुलून गेली आणि भावी डॉक्टरचा गावकऱ्यानी मोठ्या कौतुकानं जाहीर सत्कार घडवून आणला.
पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरातच टॅलेंट असतं हा गैरसमज आता बऱ्यापैकी दूर झालेला असून ग्रामीण भागातील तरुणांनी सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली आहे आणि आपला मजबूत ठसा देखील उमटवलेला आहे. खेड्यात प्रतिकूल परिस्थितीत शिकलेली पोरं आयपीएस, आयएएस झाली आहेत. प्रशासनातील बहुतेक अधिकारी हे ग्रामीण भागातून आलेले आहेत. शेतात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याची मुलं विविध विभागात अधिकार पदावर आहेत तसे ते डॉक्टर, इंजिनियर देखील आहेत. याच वैभवशाली परंपरेत पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथील तेजस पवार हा प्रवेश करीत असून गावकऱ्यांना याचे प्रचंड अप्रूप आहे. आपल्या गावातील शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर होणार या कल्पनेनेच गावकरी सुखाऊन गेले आहेत.
पंढरपूर तालुक्यातील खेड भोसे येथील प्रगतशील बागाईतदार आणि श्री विठ्ठल क्रेडिट सोसायटीचे संचालक हनुमंत ज्ञानोबा पवार यांचे चिरंजीव तेजस याला पालघर येथील वेदांता मेडिकल कॉलेजमध्ये एम. बी. बी. एस. च्या शिक्षणासाठी प्रवेश मिळाल्याची बातमी गावात आली आणि अवघे गाव आनंदून गेले. गावकऱ्यांनी एकत्र येत या पवार पिता पुत्राचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम अत्यंत आपुलकीने आणि कौतुकाने गावात घडवून आणला. सरपंच सज्जन लोंढे सर, उपसरपंच डाॅ. प्रशांत जमदाडे, वि.से.सोसायटी चे माजी.चेअरमन आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बंडू दिगंबर पवार, व्हा. चेअरमन विकास हनुमंत पवार यांच्यासह तरुण कार्यकर्त्यांनी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन केले. सरपंच सज्जन लोंढे सर यांनी सुरवातीलाच कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला व 'आपल्या गावातील युवकांना व पालकांना ही प्रेरणा मिळावी व इथून पुढे आपले खेडभोसे हे गाव डाॅक्टरांचे गाव म्हणून ओळखले जावे यासाठी आज आपण आदर्श पिता-पुत्रांचा सत्कार करत असल्याचे' सरपंच सज्जन लोंढे यांनी सांगितले.
गावकऱ्यांनी केलेल्या कौतुकाने पवार पिता पुत्र भाराऊन गेले होते आणि त्यांनी या प्रेरणादायी सत्काराबाबत गावकऱ्यांना धन्यवाद दिले. 'ट्रॅक्टरचे गाव म्हणून ओळखले जाणारे खेडभोसे भविष्यात डॉक्टरांचे गाव म्हणून ओळखले जावे यासाठी आपण प्रयत्नशील राहू असेही हनुमंत पवार यांनी सांगितले. पवार यांचा पहिला मुलगा .यशवंत हा रशिया येथे MBBS चे शिक्षण घेत आहे, तर आता तेजस यालाही वेदांता मेडिकल कॉलेज, पालघर येथे प्रवेश मिळालेला आहे. त्यांचा तिसरा मुलगाही लातूर येथे NEET ची तयारी करत आहे. (Medical admission of farmer's son, appreciation from villagers) शेतकरी असूनही या कुटुंबाने केलेली प्रगती ही प्रेरणा देणारी ठरत आहे.
हे देखील वाचा : (बातमीवर क्लिक करा )
- नागाला मारल्याने नागीण घेतेय बदला !
- राज ठाकरे यांना पंढरीतून आव्हान !
- पंढरपूर - मोहोळ रस्त्यावर मोठा अपघात !
- बारामती खवळली ! सदावर्तेची जीभ हासडणाऱ्यास लाखोंचे बक्षीस जाहीर !
- सोलापुरी पठ्या सायकलवरून पोहोचला दिल्लीला !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !