पंढरपूर : तमाशा कलावंत झोपेत असताना त्यांच्या राहुट्या जाळून टाकण्याचा धक्कादायक प्रकार पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर ( Pandharpur Crime) येथे घडला असून या घटनेचा सर्वत्र निषेध होऊ लागला आहे.
पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथून ही धक्कादायक घटना समोर आली आहे आणि या घटनेने अनेकांना प्रचंड धक्का बसला आहे. जवळपास २० तमाशा कलावंत ( Tamasha kalavant) झोपेत असताना काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून त्यांच्या राहुट्या पेटवून देण्याचा धक्कादायक आणि चिंता वाढविणारा प्रकार घडला असल्याचे समोर आले असून तमाशा कलावंतानी या बाबत संबंधितावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. तमाशा कलावंत आज या गावात तर उद्या त्या गावात आपली कला सदर करून उपजीविका करीत असतात. अशा गरीब कलावंताच्या बाबतीत अशी घटना घडणे हे निषेधार्ह आणि निंद्य असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने राहुट्यात शाहीर वामनराव पाटोळे लोकनाट्य तमाशा मंडळ मेंढापूरकर या तमाशा मंडळाचे हे महिला आणि पुरुष कलावंत झोपलेले असताना पेट्रोल टाकून राहुट्याना आग लावण्यात आली. सुदैवाने आगीची वेळीच जाणीव झाली त्यामुळे जीवितहानी झाली नाही परंतु राहुट्या मात्र जळल्या आहेत. या घटनेने तमाशा कलावंत सुन्न होऊन या घटनेकडे पहात आहेत. (set-fire-to-the-huts-of-tamasha-artist) कलावंत महिला आणि पुरुषांच्या सोबत लहान मुले देखील या राहुट्यात झोपली होती यावेळी हा प्रकार घडला असल्याचे या कलावंतांनी सांगितले आहे.
आमच्या कलावंतांचा संच रात्री मरता मरता वाचला आहे, आग लागल्याचे दिसल्यानंतर जीव वाचविण्याच्या धावपळीत त्या व्यक्तीला देखील या कलावंतानी पहिले परंतु त्याचा चेहरा व्यवस्थित दिसू शकला नाही. एकाने त्याचा पाठलागही केला पण तो पळून गेला, राहुट्या पेटलेल्या असल्यामुळे तो परत आला त्यामुळे त्याला पकडता आले नसल्याचे कलावंतानी सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात देखील चिंता व्यक्त करण्यात आली. कलावंतांच्या बाबतीत असा प्रकार घडणे हे अनाकलनीय ठरले आहे. कुणी आणि कशासाठी या अमानवी प्रकार केला असेल हाच प्रश्न ज्याला त्याला पडलेला आहे. झोपलेले कलावंत वेळीच सावध झाले नसते तर फार मोठी दुर्घटना घडण्याचा धोका होता परंतु सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.
हे देखील वाचा :
- शरद पवार यांच्या निवासस्थानावर दगडफेक !
- --- आणि अजित पवार देखील झुकले !
- 'या' शेतकऱ्यांची होणार आयकर विभागाकडून चौकशी !
- चाकूचा धाक दाखवत वृद्ध महिलेला लुटले !
- उजनीचा 'छोटा मासा' लागला गळाला !
- --- अन्यथा महावितरणला टाळे ठोकू !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !