BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ एप्रि, २०२२

परीक्षा संपताच पंढरीतून दोन मुली झाल्या बेपत्ता !

 



पंढरपूर : पंढरीतून बारावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर होताच दोन मुली बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अपहरण (Kidnapping ) झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या असून परीक्षेचा अंतिम पेपर संपल्यानंतर ही घटना घडली. एक महाविद्यालयात बारावीचा शेवटचा पेपर दिल्यानंतर दोन मैत्रिणी या एकीच्या घरी पोहोचल्या. एक  मैत्रिणीकडून घेतलेले गाईड परत करायचे असल्याचे सांगून दोघीही बाहेर पडल्या परंतु त्या परत आलेल्याच नाहीत. रात्री उशिरापर्यंत त्या घरी न परतल्यामुळे दोन्ही कुटुंबात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. काळजीत पडलेल्या कुटुंबांनी या मुलींचा शोध घेतला पण त्यांना त्यांच्याबाबत काहीच माहिती मिळाली नाही. (Two girls abducted by unknown person) दोघींचे मोबाईल देखील बंद असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क देखील होऊ शकला नाही.  चिंतातूर पालकांनी शोध घेवूनही काही थांगपत्ता न लागल्याने अखेर पोलीस ठाणे गाठले. 


दोन मुलीपैकी एक मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. बेपत्ता असलेल्या मुलींपैकी एका मुलीचे वय १७ वर्षे ११ महिन्यांचे असून दुसऱ्या मुलीचे वय १७ वर्षे ७ महिन्यांचे आहे. एकही मुलीचे वय अद्याप १८ वर्षे पूर्ण झालेले नाही. सदर दोन्ही मुलीना अज्ञाताने अज्ञात कारणासाठी पळवून नेले असल्याची फिर्याद देण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. (Pandharpur Crime) आता या दोन्ही मुलींचा शोध पंढरपूर शहर पोलीस घेत आहेत.    


अलीकडे मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढलेले असून नंतर मात्र अशा प्रकरणातून वेगळीच माहिती समोर येते असे अनेक अनुभव आहेत. अशा घटनांची शहरात चर्चाही खूप होते. प्रेमप्रकरणातून देखील पळून जाण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. यामुळे कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो तसेच पोलिसावर देखील ताण येतो. पोलीस अशा प्रकरणांचा काही दिवसातच शोध देखील घेतात आणि यातून वेगवेगळी माहिती समोर येत असते. पंढरपूर शहरात अशा प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या असताना पुन्हा दोन तरुण विद्यार्थिनी बेपत्ता झालेल्या असून त्यांचे अपहरण झाले असल्याचा गुन्हा देखील पोलिसात दाखल झाला आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !