BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ एप्रि, २०२२

चाकू दाखवत वृद्ध महिलेचे दागिने लुटले !

 



मंगळवेढा : साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्याला लुटल्यानंतर मंगळवेढा तालुक्यात आणखी एक तशाच प्रकारची घटना घडली असून एका वृद्ध महिलेस देखील चाकूचा धाक दाखवत (Mangalawedha Crime) लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. 


किराणा साहित्य घेवून दुचाकीवरून घराकडे परत जात असताना युटोपीयन साखर कारखान्याच्या एका कर्मचाऱ्यास लुटल्याची घटना घडली होती. या घटनेने मंगळवेढा तालुक्यात चिंता व्यक्त होत असतानाच एका वृद्ध महिलेस आधी फसवून आणि नंतर चाकुची भीती घालून लुटल्याप्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कधी पोलीस असल्याची बतावणी करून फसवले जात आहे तर कधी थेट लुटण्याच्या घटना सोलापूर जिल्ह्यात घडू लागल्या आहेत. घरफोड्या, दरोडे असे गुन्हे तर घडतच आहेत पण आता एकटे रस्त्यावरून जाणे देखील धोक्याचे ठरू लागले असल्याचे मंगळवेढा तालुक्यातील दोन घटनांनी दाखवून दिले आहे. 


मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील लक्ष्मी मुरलीधर शेजाळ या ७२ वर्षे वयाच्या वृध्द महिला भर दुपारी आपल्या गावी निघाल्या होत्या. मंगळवेढा येथून त्या नंदेश्वरला जाण्यासाठी रस्त्यावर जाऊन थांबल्या होत्या. यावेळी येथे एक कार येऊन थांबली आणि आपण नंदेश्वरलाच निघाल्याचे सांगून या वृद्धेस गाडीत बसवले. गावापर्यंत जाण्याची चांगली सोय झाली असे समजून लक्ष्मी शेजाळ या कारमध्ये बसल्या. प्रत्यक्षात ही कार नंदेश्वरकडे न जाता सांगोल्याच्या दिशेने गेली आणि माण नदीच्या पुढे निर्जन परिसर पाहून उभी केली. काळा शर्ट, काळी पँट आणि टोपी असा वेष परिधान केलेल्या कारचालकाने चाकूची भीती दाखवत तिच्या अंगावरील ५७ हजार रुपयांचे दागिने काढून घेतले आणि निघून गेल्याची ही घटना आहे. (Robbed the old woman with a knife) भर दिवसा एकट्या व्यक्तीला गाठून असे प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे. 


हे देखील वाचा : 

उजनीचा 'छोटा मासा' लागला गळाला ! 


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !