BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ एप्रि, २०२२

तेंव्हा तीन तास रडला अभिनेता संजय दत्त !

 




रड रडला संजय दत्त !

रविवार मनोरंजन  : अशोक गोडगे 



अभिनेता संजय दत्त याला दोन वर्षांपूर्वी कँसर झाल्याचे समोर आले होते. संजय दत्तवर हे मोठे संकट होते पण त्यातून तो बाहेर आला आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला देखील लागला आहे. त्याला झालेल्या कँसरच्या संदर्भाने त्याने एका मुलाखतीत आपल्यावर आलेल्या या संकटाबाबत सांगितले आहे.


देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव जोरात सुरु झालेला होता आणि याचवेळी संजय दत्त याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला की आपल्याला कोरोनाचा त्रास असण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. कोरोनाचे ते एक लक्षण देखील आहे घरातल्या घरात पायऱ्या चढताना देखील संजय दत्त याला त्रास होऊ लागला होता. तशाच अवस्थेत त्याने अंघोळ केली आणि आपल्या डॉक्टरांना फोन करून या त्रासाची माहिती दिली. डॉक्टरांनी देखील वेळ न घालवता तातडीने संजय दत्त यांच्या काही तपासण्या केल्या. फुफ्फुसात पाणी झाले असल्याचे समोर आले. फुफ्फुसाची अर्ध्याहून अधिक जागा पाण्याने व्यापली होती. हे पाणी काढणे आवश्यक होते त्यामुळे डॉक्टरांनी प्रथम फुफ्फुसातील पाणी बाहेर काढले. 


अचानक फुफ्फुसात पाणी झाल्याने सुरुवातीला हा टी. बी.चा प्रकार असेल असे वाटले होते पण नंतर कॅन्सर  असल्याचे समोर आले होते. कॅन्सरचे नाव ऐकले की कुणाच्या काळजात धस्स होतं. आयुष्यात अनेक संकटे पचवलेला संजय दत्त आता कुठे सावरत होता आणि त्याचवेळी त्याला कॅन्सर सारखा आजार झाल्याचे समोर आले होते. संजय दत्त याची आई असलेली अभिनेत्री नर्गिस दत्त देखील कॅन्सरशी झुंजत राहिली आणि याच कॅन्सरने त्यांचा घात केला होता. संजय दत्त याने आपल्या घरात आपल्याच आईची अवस्था अनुभवली होती आणि हाच कॅन्सर आता संजय दत्त याच्याही शरीरात घुसला होता. कॅन्सरची कल्पनाही त्याच्यासाठी असह्य होती. 


या थरारक अनुभवाबाबत संजय दत्त यानेच त्यावेळचा अनुभव सांगितलं आहे. कॅन्सरचे  निदान झाल्यानंतर संजय दत्त याला हे सांगायचे कुणी हा एक प्रश्न होता. कॅन्सर चे निदान झाल्याचे डॉक्टरांची लक्षात आले पण ही माहिती संजय दत्त याला कुणी आणि कशी द्यायची हे एक कोडे बनले होते. कॅन्सरची बातमी ऐकल्यावर संजय दत्तची अवस्था काही होईल, तो ही घटना कशी सहन करील आणि या संकटाला कसे सामोरे जाईल याचा अंदाज येत नव्हता. संजय दत्त म्हणतो, ' मला हे दुसऱ्या कुणी सांगितले असते तर रागात मी त्याला ठोसा लगावला असता, म्हणून माझी बहीण माझ्याकडे आली आणि तिने मला कॅन्सर झाल्याचे सांगितले' कॅन्सर असल्याचे सांगून आता पुढे काय करायचे असा प्रश्न संजय दत्त याच्या बहिणीने विचारला होता. 


संजय दत्तने सांगितले, ' असे काही संकट येते तेंव्हा माणूस पुढे काय करायचे ते ठरवायला लागतो पण मला काहीच सुचत नव्हते. त्यावेळी मी दोन तीन तास फक्त रडत बसलो होतो. माझ्या डोक्यात केवळ माझी मुलं आणि पत्नी यांचाच विचार येत होता. काही झाले तरी मला खंबीर राहणे गरजेचे होते. हृतिक रोशनच्या वडिलांनी एक डॉक्टरांचे नाव सुचवले आणि माझ्यावर उपचार सुरु झाले. उलट्या होतील, केस जातील असे देखील डॉक्टरांनी सांगितले होते. भारतात उपचार घेऊन मी केमोथेरपीसाठी दुबईला गेलो, तेथे मी सायकल चालवत असायचो, दोन तीन तास बॅडमिंटन खेळायचो. (Sanjay Dutt cried for three hours) आज मी कॅन्सरमुक्त झालो आहे पण जेंव्हा पहिल्यांदा कॅन्सरबाबत समजले तेंव्हा मी तीन तास रडलो होतो !    


🅾️- अशोक गोडगे 



 


हे देखील वाचा :>>

......................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !