BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ एप्रि, २०२२

पंढरीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून आत्महत्येचा प्रयत्न !

 


पंढरपूर : अध्यात्माचा वारसा असलेल्या विठुरायाच्या पंढरीत एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे, एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून नंतर आत्महत्या करण्याचा प्रकार नराधमाने केला आहे. 


पंढरीला हादरवून टाकणारी एक मोठी घटना उघडकीस आली असून अल्पवयीन मुलीवर आधी बलात्कार केला आणि ही घटना उघडकीस येऊ लागताच कायद्याच्या भीतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न या नराधमाने केला आहे. शहर पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी तीस वर्षे वयाच्या नराधमाला पोलिसांनी गजाआड केले आहे. केवळ साडे तेरा वर्षे वयाच्या मुलीवर झालेल्या या अत्याचाराने पंढरी हादरली आहे. पंढरपूर शहराला गुन्हेगारी पार्श्वभूमी असली तरी अशा प्रकारच्या घटना दुर्मिळ आहेत. अल्पवयीन मुलीला फसवून नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याची घटना पंढरपूर शहरात घडली आहे. 


अवघ्या साडे तेरा वर्षाचे वय असलेल्या एक मुलीस तिच्या घराजवळून फसवून चिलारीच्या झुडुपात नेऊन हा प्रकार करण्यात आला आहे. आपल्या घरासमोर थांबलेल्या या मुलीस 'तुला तुझ्या वडिलांनी मेडिकल करण्यासाठी बोलावले आहे' अशी बतावणी करून विठ्ठल सत्यवान लोखंडे या तीस वर्षे वयाच्या नराधमाने या मुलीला नेले. तिला घेवून तो तुळशी वृंदावनच्या परिसरात असलेल्या चिलारीच्या झुडूपात घेवून गेला आणि तेथे त्याने बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. ( Pandharpur crime, Rape of a minor girl)  अत्याचाराच्या या प्रकाराबाबत कुणाला काही सांगू  नको म्हणून तिला धमकीही दिली. कुणाला सांगितलेस तर मारून टाकीन असे धमकावले आणि नराधम तेथून निघून गेला. 


अकस्मात घडलेल्या या सर्व प्रकाराने अल्पवयीन मुलगी घाबरून गेलेली होती. तिला त्रास होऊ लागल्यामुळे तिने आपल्या घरी या घटनेची माहिती दिली आणि प्रकार उजेडात आला. पिडीत मुलीला घेवून तिचे पालक शनिवारी पोलिसात गेले पण नराधम विठ्ठल लोखंडे ( तुळशी, ता. माढा) हा पाळतीवरच होता. पिडीत मुलगी आणि तिचे पालक पोलीस ठाण्यात आले असता नराधम लोखंडे त्यांच्या पाठोपाठ आला. झाल्या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात प्रकरण पोहोचले असल्याचे त्याच्या लक्षात आले होते. पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या बाथरूममध्ये तो गेला आणि  त्याने आपल्या गळ्यावर ब्लेड मारून घेतले. (Accused attempted suicide) दरम्यान पोलिसांनी मोठ्या कौशल्याने त्याला ताब्यात घेतले. 


पिडीत मुलीच्या तक्रारीपासून आपला बचाव व्हावा यासाठी त्याने हा प्रकार केला परंतु पोलिसांनी वेळीच त्याच्या मुसक्या आवळल्या. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपासह आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा देखील त्याच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधापासून सरंक्षण (पोस्को)  अशा विविध कलमानुसार विठ्ठल लोखंडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेने पंढरी हादरून गेली आहे.         


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !