BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ एप्रि, २०२२

सदावर्तेची जीभ हासडा, लाखोंचे बक्षीस मिळवा ! कामगार संतप्त !!



बारामती : गुणरत्न सदावर्ते यांची  जीभ हासडणाऱ्यास अकरा लाखांचे तर त्यांच्या हातात बांगड्या घालणाऱ्या महिलेस पाच लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. सदावर्ते विरोधात राज्यात वातावरण तापले असतानाच बारामतीत अधिक उद्रेक दिसू लागला आहे. 


शरद पवार यांच्या मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी करण्यात आलेल्या हल्ला प्रकरणी एस. टी. संपकरी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते हे मोठ्या अडचणीत आले असून रोज नव्या अडचणीत येताना दिसत आहेत. राज्यातील विविध पोलीस ठाण्यात सदावर्ते विरोधात गुन्हे दाखल होत असून सद्या सातारा पोलिसांच्या कोठडीत ते आहेत. पुणे, कोल्हापूर, अकोट येथील पोलीस देखील त्यांना ताब्यात घेवून अटक करण्याची शक्यता आहे. विविध प्रकारे त्यांच्या अडचणी वाढत असताना पोलिसांच्या तपासात धक्कादायक पुरावे हाती येत असतानाच त्यांच्या वकील असलेल्या पत्नी  जयश्री पाटील या देखील बेपत्ता झाल्या आहेत. त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला असल्याने पोलीस त्यांच्या शोधात आहेत. त्यानाही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. 


शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील निवासस्थानावर हल्ला करण्याच्या प्रकारामुळे राज्यभर संतापाचे पडसाद उमटत असताना बारामती येथे संतापाचा उद्रेक दिसून येऊ लागला आहे. बारा तारखेला बारामतीत येण्याचा इशारा देत शरद पवार यांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न सदावर्ते यांनी केला होता त्यामुळे बारामती आधीच संतप्त आहे.  वकील गुणरत्न सदावर्ते विरोधात कामगारांनी बारामती येथे आज एक रॅली काढली होती. पेंन्सिल चौकापासून सुरु झालेली ही रॅली पुन्हा याच चौकात आली आणि तेथे समारोप करण्यात आला.   यावेळी कामगार आणि कामगार नेते यांनी सदावर्ते यांचा निषेध करीत त्यांना आव्हान देत थेट बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. 


तालुका पोलीस ठाण्याच्या समोरच्या बाजूस या कामगारांची सभा झाली आणि या सभेत कामगार नेत्यांनी झालेल्या घटनेचा निषेध तर केलाच पण सदावर्ते याना आव्हान देखील देण्यात आले.  सदावर्ते यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास पन्नास हजाराचे बक्षीस जाहीर झाल्यानंतर आता बारामती येथे देखील अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. (Workers in Baramati are aggressive against Gunaratna Sadavarte) सदावर्ते यांची जीभ हासडेल त्याला अकरा लाखांचे बक्षीस यावेळी जाहीर करण्यात आले. सदावर्ते यांच्या हातात बांगड्या भरणाऱ्या महिलेस पाच लाखांचे बक्षीस देण्याचे कामगार नेते तुकाराम चौधर यांनी घोषित केले. 


आम्ही वाट पाहतोय !

राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या विरोधात न्यायालयात जाऊन विरोध करणारा कामगाराच्या हितासाठी काय न्याय मिळवून देणारा आहे ? असा सवाल यावेळी कामगार नेत्यांनी उपस्थित केला. सदावर्ते बारामतीत येणार होते, आम्ही त्यांची वाट पाहत आहोत असे देखील यावेळी सांगण्यात आले. 


अजितदादांसाठी रस्ता मोकळा !

कामगारांनी बारामती येथे आज भव्य निषेध रॅली काढली. आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बारामतीत होते आणि ते ज्या रस्त्याने जाणार होते तो रस्ता टाळून कामगारांनी आपली रॅली काढून अजितदादांसाठी रस्ता मोकळा ठेवला. यामुळे पोलिसांवर येणार ताण देखील कमी झाला.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !