मोहोळ : एकाच दिवशी रोखलेल्या तीन बाल विवाहातील अल्पवयीन मुलीना पतीच्या घराऐवजी बाल गृहात जाण्याची वेळ आली असून तीनही प्रकारणे (Child Marrages) सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आहेत.
बालविवाह प्रतिबंधक कायदा अमलात असून अल्पवयीन मुलामुलींचे विवाह करणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे माहित असताना देखील चोरट्या आणि छुप्या पद्धतीने आजही बाल विवाह होताना दिसतात. ग्रामीण भागात बालविवाहाचे प्रमाण अधिक असून प्रशासनाला वेळीच याची माहिती मिळाली तर हे बालविवाह रोखले जातात आणि विवाहानंतर ही माहिती मिळाल्यास कायद्यानुसार कारवाई करण्यात येत असते. बालाविवाहाबाबत शासन प्रशासनाकडून जनजागृती, समुपदेशन करण्यात येते, कायद्याची माहिती दिली जाते तरीही काही पालक अल्पवयीन मुलींचे विवाह करीत असल्याचे सातत्याने दिसते. मोहोळ तालुक्यातील असे तीन बालविवाह रोखून प्रशासनाने तीन मुलीना बालगृहात दाखल केले आहे.
मोहोळ तालुक्यात अनगर आणि नरखेड या गावात होऊ घातलेल्या तीन बालविवाहाची माहिती 'चाईल्ड हेल्पलाईन' पथकास मिळाली होती. यातील दोन विवाह नरखेड येथे तर एक विवाह अनगर येथे होणार होते. सदर तीन बालविवाहासंबंधी माहिती मिळताच प्रशासन अलर्ट झाले. बालकल्याण समिती अध्यक्षा अनुजा कुलकर्णी, सुवर्णा बुंदाले, प्रकाश ढेपे, महिला व बालविकास अधिकारी विजय खोमणे, चाईल्ड हेल्पलाईनचे जिल्हा समन्वयक आनंद ढेपे, सदस्य स्वप्नील शेट्टी, संगीता पारशेट्टी यांचे पथक पोलिसांना सोबत घेऊन नरखेड येथे पोहोचले. थेट लग्न मंडपात पोलीस आणि हे पथक दाखल झाल्याने वेगळेच वातावरण तयार झाले. लग्नाबाबत प्रशासनाला माहिती मिळाल्याची जाणीव सर्वानाच झाली. अधिकारी दाखल झाल्याची माहिती गावात देखील वेगाने पसरली आणि लोक कानोसा घेऊ लागले.
प्रशासनाने लग्नमंडपात नवरी म्हणून उपस्थित असलेल्या अल्पवयीन मुलींची चौकशी केली तेंव्हा मुलीचे वय हे १७ वर्षांचे असल्याचे समजले. विवाह होत असलेल्या मुली अल्पवयीन असल्याची खात्री होताच प्रशासनाने हा बालविवाह रोखला. त्यानंतर या पथकाने दुपारी अनगर गाठले तेंव्हा तेथेही एक विवाहाची तयारी सुरु होती. लग्नाची लगबग सुरु असतानाच हे पथक पोहोचल्याने तेथेही खळबळ उडाली. (The administration prevented three child marriages) पथकाने मंडपातील नवरी मुलीकडे चौकशी केली असता या मुलीचे देखील वय १७ वर्षे ९ महिन्यांचे असल्याची माहिती मिळाली. मुलीच्या वयाबात खात्री होताच पथकाने हा बालविवाह देखील रोखला.
ताब्यात घेतले !
नरखेड येथील दोन आणि अनगर येथील एक असे तीन बालविवाह रोखल्यानंतर दोन्ही बाजूंच्या संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन मोहोळ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे संबंधितांचे जबाब नोंदविण्यात आले तसेच बालविवाह हा कायद्याने गुन्हा असल्याची माहिती देखील त्यांना देण्यात आली.
बालगृहात रवानगी !
विवाह होऊ घातलेल्या तीन अल्पवयीन मुलींना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. बालकल्याण समितीने तीनही अल्पवयीन मुलींना बालगृहात दाखल करण्याचे आदेश दिले त्यानुसार या मुलींची रवानगी बालगृहात करण्यात आली.
हे देखील वाचा : (बातमीवर क्लिक करा )
- सुरक्षा कवच तोडून अज्ञात व्यक्ती शरद पवारांच्या व्यासपीठावर !
- कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत, सतर्कतेचा इशारा !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !