पंढरपूर : पंढरपूर - मोहोळ रस्त्यावर नारायण चिंचोलीजवळ भाविकांची कार आणि राज्य परिवहन महामंडळाची बस यांच्यात अपघात होऊन एक जण ठार झाला तर सात जण जखमी झाले आहेत.
सिमेंटचे रस्ते झाल्यापासून आणि रस्त्यांची कामे सुरु असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असताना आज पुन्हा एक अपघात झाला आहे. चैत्र वारीसाठी येत असलेल्या आणि पंढरीतून जात असलेल्या भाविकांच्या वाहनाला पंढरपूर परिसरात सलग दोन दिवस दोन अपघात झाले होते. या घटना ताज्या असताना आज नारायण चिंचोली, देगाव पाटीजवळ पंचरत्न हॉटेलच्या जवळ एस टी बस आणि कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे.
उस्मानाबादकडून पंढरपूरकडे येत असलेली राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कार (एम एच ११ बी व्ही १९४२) यांच्यात पंढरपूर - मोहोळ रस्त्यावर हॉटेल पंचरत्नच्या जवळ समोरासमोर जोराची धडक झाली आहे. या अपघातात कारच्या समोरच्या बाजूस जोराचा मार बसल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे तर एस टी बसच्याही पुढील भागाचे नुकसान झाले आहे. परिसरातील नागरिकांनी कारमधील जखमींना बाहेर काढून पंढरपूर उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले असून जखमीतील एकाचा मृत्यू झाला असल्याचे समजते. उस्मानाबाद - कोल्हापूर ही बस पंढरपूरकडे येत असताना आणि भाविक आपल्या कारमधून विठ्ठल दर्शन घेवून पंढरपूर येथून सोलापूरकडे निघाली होती. कारमधील भाविक जखमी झाले असून त्यांच्याबद्धल अधिक माहिती मिळू शकली नाही. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अपघात झाल्यानंतर रस्त्यावर परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. परिसरातील नागरिकांनी जखमींना बाहेर काढण्यात आणि त्यांना रुग्णालयात पाठविण्यासाठी मदत केली. या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक वाहने थांबलेली होती.
हे देखील वाचा : (बातमीवर क्लिक करा )
- बारामती खवळली ! सदावर्तेची जीभ हासडणाऱ्यास लाखोंचे बक्षीस जाहीर !
- सोलापुरी पठ्या सायकलवरून पोहोचला दिल्लीला !
- सोलापूर जिल्ह्यातील दोन गावात एकाच दिवशी रोखले तीन बालविवाह !
- सुरक्षा कवच तोडून अज्ञात व्यक्ती शरद पवारांच्या व्यासपीठावर !
- कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत, सतर्कतेचा इशारा !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !