BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ एप्रि, २०२२

वादग्रस्त गुणरत्न सदावर्ते यांचा पाय चालला खोलात !



कोल्हापूर : सिल्व्हर ओक वरील हल्ल्यानंतर संपकरी एस टी कर्मचाऱ्यांचे वकील एड. गुणरत्न सदावर्ते यांचा पाय आता अधिकच खोलात जाऊ लागला असून अकोट येथे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असतानाच कोल्हापूर येथेही एक तक्रार करण्यात आली आहे. 

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात गुणरत्न सदावर्ते हे वकील आणि संपकरी कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून चर्चेत आले पण नंतर मात्र ते वादग्रस्त म्हणून समोर आले. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर कट केल्याचा गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने त्यांना दोन वेळा दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सद्या ते पोलिसांच्या कोठडीत असताना पोलीस तपासांत अनेक धक्कादायक माहिती पोलिसांना मिळू लागली आहे त्यामुळे तर सदावर्ते अडचणीत आलेलेच आहेत शिवाय संपकरी कर्मचारी यांच्याकडून जमा केलेल्या मोठ्या रकमेप्रकरणी त्यांचा पाय अधिक खोलात जाताना दिसत आहे. 

एस टी कर्मचाऱ्यांकडून जवळपास ३ कोटी रुपये गोळा करून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला असून सदावर्ते आणि त्यांची पत्नी एड. जयश्री पाटील यांच्या विरोधात अकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबध्दल सातारा पोलिसात पूर्वीचा एक गुन्हा दाखल असून सदावर्ते यांना उचलण्यासाठी सातारा पोलीस मुंबईत पोहोचले आहेत. त्यामुळे सातारा पोलीस त्यांना ताब्यात घेणार आहेतच पण अकोट पोलीस देखील सदावर्ते आणि त्यांच्या पत्नींना अटक करण्याच्या तयारीत असणार आहेत.  मराठा आरक्षणाच्या संदर्भात सदावर्ते यांनी केलेले बेताल वक्तव्य त्यांना भोवणार असून याबाबत अद्याप कारवाई झालेली नव्हती. 

कोल्हापुरात तक्रार 
एस टी कर्मचाऱ्याकडून जमा करण्यात आलेल्या पैशाबाबत वादळ उठलेले असताना आणि पोलिसात गुन्हा दाखल झालेला असताना कोल्हापूर येथे देखील सदावर्ते यांच्याविरोधात पोलिसात आणखी एक तक्रार देण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात लढण्यासाठी सदावर्ते यांनी बेकायदेशीर पैसा जमा केला असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आलेली असून सदावर्ते यांनी जमा केलेला पैसा कुठे गेला याची चौकशी करावी करण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायमूर्ती यांचा अवमान होईल अशी वक्तव्ये देखील त्यांनी केली असल्याचे म्हटले आहे.

वाटेकरी कोण ? 
एस टी कर्मचारी यांच्याकडून जमा करण्यात आलेली रक्कम नेमकी कोठे गेली याची चौकशी तर सुरु झालीच आहे पण या रकमेत आणखी कोण वाटेकरी होते ? याचीही चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे. सुरुवातीला या आंदोलनात दोन नेते आघाडीवर होते, या नेत्यांना यातील काही वाटा दिला गेला आहे काय ? याची चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे. एकुणात सिल्व्हर ओक वरील हल्ल्यानंतर एड गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी वाढत चालल्या (Ad. Gunaratna Sadavarte's difficulty increases) असून त्यांचे पाय अधिकच खोलात चालले असल्याचे दिसत आहे.  

   




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !