BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ एप्रि, २०२२

पंढरीतील रंगेल जीम प्रशिक्षकाला ठोकल्या बेड्या !




पंढरपूर : जीम प्रशिक्षकाकडून महिला आणि तरुणींचा लैंगिक छळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार पंढरीत उघडकीस आला असून या रंगेल प्रशिक्षकास (Gym Trainer)अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 


अलीकडे नागरिकांत आरोग्याबाबत जागरुकता निर्माण झाली असून सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांची संख्या सतत वाढत असून शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायामशाळेत जाण्याकडे देखील मोठा कल आहे. जीममध्ये जाऊन शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी काही महिला आणि तरुणीही जात आहेत पण एका जीम प्रशिक्षकाचे काळे धंदे चव्हाट्यावर आल्याने पंढरी हादरली आहे. जीम सारख्या ठिकाणी आणि प्रशिक्षकानेच केलेले रंगेल उद्योग एक महिलेमुळे उघडकीस आले आहेत. अनेक महिला आणि मुलींची या प्रशिक्षकाने लैंगिक छळवणूक (Sexual harassment) केली असल्याचे समोर येऊ लागले आहे त्यामुळे पंढरीला धक्का बसला आहे. 


पंढरीतील एक महिला शरीरीरिक तंदुरुस्तीसाठी १८ जानेवारी २०२२ पासून पंढरीतील एका जीममध्ये जात होत्या. अनेक महिला आणि मुली या जीममध्ये जात असतात. येथे प्रवेश घेतेवेळी मोबाईल क्रमांक घेतले गेले होते. प्रारंभी जीम प्रशिक्षक श्रीकांत राजू गायकवाड (वय २६) याने डाएटची माहिती देण्याच्या कारणाने सदर विवाहित महिलेस मोबाईलवरून संपर्क करणे सुरु केले. त्यानंतर या प्रशिक्षकाने वारंवार मोबाईलवरून फोन तसेच मेसेज करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रकार पाहून या महिलेने त्यांना याबाबत हरकत घेतली. ज्या काही सूचना असतील त्या जीममध्ये आल्यावर द्याव्यात' असे या महिलेने त्याला स्पष्टपणे सांगितले तरी देखील त्याचे फोन करणे थांबले नाही. वेळी अवेळी मोबाईलवर संपर्क करणे, व्हाट्स ऍप वरून व्हिडीओ कॉल करणे, फेसबुक तसेच अन्य पर्यायाने संपर्क करून जवळीक साधण्याचा प्रयत्न त्याने सुरूच ठेवला होता. 


पोलिसात तक्रार 

सदर महिलेचा पती कामानिमित्त बाहेर असताना महिला एकटी जीममध्ये गेल्यानंतर एकटेपणाचा गैरफायदा घेत प्रशिक्षक श्रीकांत गायकवाड हा वाईट नजरेने पाहत होता तसेच व्यायामाबाबत सूचना देण्याचे निमित्त करून वाईट हेतूने स्पर्श करीत होता. हा प्रकार सदर महिलेने आपल्या पतीला सांगितलं तेंव्हा त्यांनी जिम बंद करण्याचा निर्णय घेतला. जीममध्ये जाणे बंद केल्यानंतर देखील या महिलेशी वेगवेगळ्या मार्गाने संपर्क करीत राहिला आणि नंतर व्हाट्स ऍप चॅटिंग, फोटो पतीला दाखविण्याच्या धमक्या देऊ लागला. (Sexual harassment of Women in the Gym) अखेर हा त्रास असह्य झाल्यानंतर आपल्या पतीसोबत या महिलेने पोलीस ठाणे गाठले आणि प्रशिक्षक श्रीकांत गायकवाड याचे काळे कारनामे उघडे केले 


पोलिसांचे आवाहन 

सदर महिलेने पोलिसात तक्रार दिल्यानंतर या रंगेल प्रशिक्षका श्रीकांत गायकवाड याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला रात्री अटक केली आहे. दरम्यान वेगवेगळ्या जिममध्ये प्रशिक्षणाचे काम करीत असताना त्यांना असे बरेच कारनामे केले असल्याचे समोर येत आहे. जिममध्ये येणाऱ्या महिला तसेच मुलींच्यासोबत जवळीक साधून खोट्या प्रेमाचे नाटक करून आपल्या जाळ्यात ओढले असल्याची माहिती समोर येऊ लागली असून त्याच्याकडून अशा प्रकारे फसवणूक, लैंगिक छळवणूक झाली असल्यास महिला, मुलींनी पोलिसात तक्रार देण्यासाठी पुढे यावे, त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पंढरीत उघडकीस आलेल्या या घटनेमुळे मात्र पंढरीला मोठा धक्का बसला असून या घटनेमुळे महिला, मुली जीममध्ये जाण्यास राजी होणार नाहीत. शिवाय चांगल्या जीमदेखील बदनाम होण्याचा धोका आहे.    


हे देखील वाचा : 



 अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !   

    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !