BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ एप्रि, २०२२

भाजप माजी नगरसेविका कार्यालयात पैशाची पाकिटे सापडली !



कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीच्या दरम्यान  भाजपच्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयात प्रचार साहित्य आणि पैशांची पाकिटे (Kolhapur by election) सापडल्याने पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे 
 
उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक ही विविध राजकीय पक्षांच्या मोठ्या नेत्यांच्या सभांनी गाजली तशी ती विविध आरोप आणि प्रत्यारोपाने देखील गाजलेली आहे. भाजपने येथे जोर लावलेला असतनाच महाविकास आघाडीने देखील आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झालेली असतानाच भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयात पैशाची पाकिटे सापडली असून निवडणूक कोणत्या दिशेला जाऊ लागली आहे याचे देखील चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपच्या माजी नगरसेविका सुनंदा मोहिते यांच्या मंगळावर पेठेतील पद्मावती परिसरातील कार्यालयात प्रचार पत्रके आणि पैशांची पाकिटे सापडली आहेत त्यामुळे पोलिसांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 


निवडणुकीसाठी मतदारांना पाकिटातून पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून भाजपच्या पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यामुळे ऐन निवडणुकीत ही वेगळीच खळबळ उडवून देणारी बाब ठरली. पोलिसांनी यावेळी ८६ हजार ३० रुपयांची रोकड जप्त केली आहे. पोलिसांच्या भरारी पथकाने सुतारवाडा, मंगळावर पेठ, वारे वसाहत येथे ही कारवाई केली आहे. ताब्यात घेतलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर अदखलपात्र गुन्हा नोंद करून त्यांना सोडून देण्यात आले आहे.  पाकिटामध्ये भरलेल्या नोटा निवडणुकीच्या काळात कशासाठी ? हा सवाल उपस्थित होत असून निवडणूकीत असे प्रकार कशासाठी केले जातात हे सामान्य जनतेला देखील माहित आहे.  (Money Envelopes found in Kolhapur Election)निवडणुकीत पैशाचा कशा प्रकारे वापर होतो याची माहितीही मतदारांना चांगली असते. 


मतांची खरेदी ! 
कोल्हापूरच्या या पोट निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मतदारांना पैसे देवून मते घेत असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे. भाजपला जनाधार नाही म्हणून पैसे वाटून मते घेतली जात आहेत असा आरोप देखील त्यांनी केला. भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव केल्याची टीका देखील सतेज पाटील यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाने मात्र कुठेही असा प्रकार केला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. 


भाजपला जनाधार नाही 
भाजपला जनाधार नसल्याने त्यांना पैसे वाटून मते घ्यावी लागत आहेत पण पैशावर आपला स्वाभिमान विकणारे कोल्हापूरकर नाहीत हे कोल्हापूरचे मतदारच दाखवून देतील असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे. पैशाची पाकिटे सापडल्यामुळे मात्र कोल्हापुरात प्रचंड खळबळ उडाली असून मतदारात या प्रकरणाची मोठी चर्चा आहे. 


प्रतिष्ठा पणाला !
महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून त्यामुळे राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव आणि भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी पालकमंत्री असलेले भाजपचे चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली असल्याचे  दिसत आहे.    


हे देखील वाचा : 


 अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !       



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !