BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ एप्रि, २०२२

पंढरपूरजवळ वारकऱ्यांच्या गाडीला अपघात !





पंढरपूर : चैत्र एकादशीनिमित्त पंढरीला येत असलेल्या वारकऱ्यांच्या वाहनाला अपघात होऊन एकोणीस वारकरी जखमी झाले आहेत तर अकरा वारकरी या अपघातात (Pandharpur Accident)गंभीर जखमी झाले आहेत.


अपघाताचे प्रमाण सगळीकडेच वाढते असून रोज अनेक अपघात होताना दिसत आहेत. त्यात पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी येत अथवा दर्शन घेवून परत आपल्या गावी जाताना होणारे अपघात चिंताजनक ठरू लागले आहेत. नुकताच सोलापूरजवळ भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन तुळजापूर तालुक्यातील सहा भाविक मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली होती आणि आज पुन्हा पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन १९ वारकरी जखमी झाले असून यातील ११ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. चैत्र एकादशीच्या (Chitra wari, Pandharpur Vitthal Darshan) विठुरायाच्या दर्शनाऐवजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. 


पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील काही भाविक पिकअप वाहन घेवून चैत्र एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे येत होते. पंढरपूरपासून काही अंतरावर आल्यानंतर हे वाहन महावितरणच्या उच्च दाबाच्या खांबावर जावून धडकले आणि हा अपघात झाला. पंढरपूरला येण्यासाठी हे भाविक रात्रीच निघालेले होते आणि पहाटेच्या दरम्यान पिराची कुरोली हद्दीत आले होते. चालकाला झोप लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअप जाऊन ३३ के व्ही च्या विद्युत वाहिनीच्या खांबावर जाऊन आदळले. अर्धवट झोपेत असलेले १९ वारकरी यात जखमी झाले असून ११ गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले असल्याची माहिती आहे. 


राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु झाल्यापासून एस टी ची उपलब्धता नसल्याने वारकरी ट्रॅक्टर, पीकअप अशा वाहनाचा उपयोग करून पंढरपूरला येत आहेत आणि अपघात होऊ लागले आहेत. तुळजापूर तालुक्यातील भाविक देखील ट्रॅक्टर घेऊन पंढरपूरला येत असताना अपघात झाला होता आणि आज पीकअप वाहनाचा अपघात झाला. सकाळच्या सुमारास पंढरपूर येथे पोहोचून चंद्रभागा स्नान आणि दर्शन आटोपून परत जाण्याच्या इराद्याने हे भाविक रात्रीच तळेगाव दाभाडे येथून निघाले होते. रात्रीचा प्रवास असल्याने पहाटेच्या सुमारास चालकाच्या डोळ्यावर आलेल्या झोपेने हा अपघात घडला. (Devotees injured in an accident near Pandharpur) रस्ते चकाचक झालेले असल्याने वाहनाचा वेग देखील वाढला आहे. भाविकाने वाहन सरळ मोठ्या खांबावर आदळले त्यामुळे भाविकांना जोराचा मार लागलेला आहे. 


हे देखील वाचा : 



 अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !