मोहोळ : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या २ हजार १२८ सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यात आले (Bhima Sahakari sakhar karakhana) असून यामुळे कारखाना वर्तुळात आणि मोहोळ तालुक्याचा राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सहकारी साखर कारखाने हे स्थानिक राजकारणाचे प्रमुख केंद्र असते आणि शेतकरीवर्गाच्या आर्थिक विकासात सहकारी साखर कारखाने महत्वाची भूमिका बजावत असतात. तालुक्याचे राजकारण सहकरी साखर कारखान्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते त्यामुळे साखर कारखाने आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी अनेक स्थानिक नेत्यात स्पर्धा सुरु असते. कारखान्याचे सभासद हे या राजकारणात महत्वाची भूमिका बजावत असल्याने त्यांना वेगळे महत्व असते. अशा परिस्थितीत टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या २ हजार १२८ सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यात आल्याने खळबळ उडणे स्वाभाविकच आहे.
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या २ हजार १२८ सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा आदेश सोलापूर प्रादेशिक सहसंचालक (साखर) राजकुमार दराडे यांनी दिला आहे. त्यामुळे भीमा कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या गटाला हा मोठा धक्का समजला जात आहे. भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण आणि पंचायत समितीचे माजी सदस्य अभिजित उर्फ नानासाहेब पवार (अंकोली) यांनी या सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याबाबत अर्ज केलेला होता. ९ सप्टेंबर २०२१ रोजी त्यांनी दिलेल्या अर्जात २ हजार ४५१ सभासादाबाबत आक्षेप घेण्यात आलेला होता.
कारखाना कार्यक्षेत्रात दहा गुंठ्यापेक्षा कमी जमीन असणे, भाग भांडवलाची रक्कम अपुरी असणे अशा अनेक त्रुटी निदर्शनास आणून २ हजार ४५१ सभासदांचे सभासदत्व रद्द करावे अशी मागणी करून हरकती दाखल केल्या होत्या. सदर प्रकरणी सोलापूर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडे सहा वेळा सुनावणी घेण्यात आली परंतु ज्यांच्या विषयी हरकती घेण्यात आल्या होत्या त्यांनी समाधानकारक खुलासा केला नाही. अनेकदा संधी दिली असतनाही हरकतीच्या मुद्द्यांची पूर्तता या सभासदांना करता आली नाही.
संधी देऊन आणि सहा वेळा सुनावणी घेवूनही 'त्या' सभासदांनी पूर्तता केली नसल्यामुळे सभासद सुनील चव्हाण आणि अभिजित पवार यांचे म्हणणे ग्राह्य धरण्यात आले आणि सभासदत्व रद्द करण्याचा आदेश देण्यात आला. (Two thousand members canceled ) यातील पात्र असलेल्या ३२३ सभासंच्या पैकी ११० सभासदांची भाग भांडवलाची रक्कम अपुरी असल्याने तसेच अन्य कारणामुळे त्यांचेही सभासदत्व धोक्यात आलेले आहे. या निकालाने सहकार विश्वात खळबळ उडाली असून मोहोळच्या राजकीय वर्तुळातही या निकालाची चर्चा सुरु आहे.
हे देखील वाचा : >>
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !