BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ एप्रि, २०२२

दारुड्याने थांबवले अजित पवारांचे भाषण !

 



इंदापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांचे भाषण रंगू लागले आणि मध्येच एका दारुड्याने दादांच्या भाषणात अडथळा आणला त्यामुळे भाषण गुंडाळण्याची वेळ अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर  आली आणि पुणे जिल्ह्यात या घटनेची चर्चा रंगली. 


राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे जाहीर भाषण नेहमीच कडक असले तरी मिष्कील असते. हसत हसत अजित पवार कधी कुणाचे वस्त्रहरण करतील हे सांगता येत नाही. सहकारी नेता असो किंवा कार्यकर्ता असो, दादा त्याची खास आपल्या स्टाईलने धुलाई करतात हा अनुभव सर्वांनाच आहे. ऐनवेळी काही घटना घडली तरी अत्यंत हजरजबाबीपणे दादा भाष्य करीत असतात त्यामुळे त्यांच्या भाषणात ओरखडे असले तरी श्रोते खुश असतात. इंदापुरात मात्र एका बेवडयाने अजित पवार यांची बोलती बंद केली आणि दादांचा भाषणाचा मूड गेला. इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील सभेत ही घटना घडली. अजितदादा बोलत असताना दारुड्याने केलेल्या एन्ट्रीची इंदापूर तालुक्यात तर धमाल चर्चा रंगली आहे. 


भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे एकेकाळचे खंदे समर्थक आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी कॉन्ग्रेस पक्षात प्रवेश करून भाजप आणि हर्षवर्धन पाटील यांना मोठा झटका दिला आहे. या प्रवेश समारंभास उप मुख्यमंत्री अजितदादा पवार आवर्जून उपस्थित होते.  या कार्यक्रमात अजित पवार बोलत असतानाच एका तळीरामाने एन्ट्री केली आणि अजित पवार यांना आपले भाषण गुंडाळावे लागले. अजित पवार यांनी त्याचा खरपूस समाचार घेतला पण अशा व्यत्ययामुळे आपला मूढ गेला असे सांगून त्यांनी आपले भाषण थांबवले. 


अजित पवार आपल्या खास स्टाईलने भाषण करीत असतानाच समोर बसलेल्या श्रोत्यातून एक दारुड्याने 'दादा ... दादा ...' असे म्हणत दादांचे लक्ष वेधले. (Alcoholist entry in Ajit Pawar's Indapur-meeting) अजितदादा हे आपल्या कार्यकर्त्यांना नेहमी व्यसनापासून दूर राहायला सांगतात आणि नशेतील एखादा कार्यकर्ता दिसला तर त्याची खास आपल्या पद्धतीने धुलाई करतात. येथे तर भाषण सुरु असतानाच एका तळीरामाने त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला. अजितदादांनी त्याला पाहून आपले भाषण थांबवले. अजितदादा कपाळावर हात मारीत म्हणाले, 'गडी दुपारीच गेल्या चंद्रावर, ह्याला काय हाय का न्हाय !' दादा वैतागले असले तरी त्या दारुड्यावर त्याचा फारसा काही फरक पडला नाही. तो काहीतरी बोलतच राहिला आणि दादा वैतागून गेले. 'जरा बस..... बस खाली बस' असे दादा म्हणत राहिले पण त्याच्यावर काहीच फरक पडत नव्हता. 



भर सभेत अजितदादा आणि तळीराम यांचाच संवाद सुरु झाला होता.  तो काही बसायला तयार नव्हता. त्याला पाणी प्यायला देण्याची सूचना दादांनी कार्यकर्त्यांना दिली. भाषण सुरु करण्याचा दादांचा मूढ गेला होता. 'जाऊ द्या, आता आपल्याला पवार साहेबांचे भाषण ऐकायचे आहे.  असली लोकं दादा दादा करायला लागली की माझा मूढच जातो' असे म्हणत आपले भाषण थांबवले. 'काळजी करू नको, तू नंतर येवून मला भेट ' असे दादांनी त्याला सांगितले .   


लोकांना किती बनवायचं ?  
या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. 'आधीच्या निवडणुकीत सुत गिरणी काढण्याची हूल दिली आणि निवडणुकीनंतर सूतगिरणीचे नाव देखील काढले नाही,  इंडस्ट्री काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मातीमोल किमतीने जमिनी दिल्या, पैसे गोळा केले पण तिथं कुसळाशिवाय काहीच दिसत नाही. लोकांना किती बनवायचं?  या बनवाबनवीमुळे तर दत्तात्रय भरणे यांनी बाबाला दोनदा कधी चीतपट केलं हे कळलंही नाही ! बनवाबनवी केली  नसती तर असं घडलं नसतं' असे टोले अजितदादांनी कुणाचेही नाव न घेता लगावले.   

हे देखील वाचा : >>



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !