BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ नोव्हें, २०२३

सुहागरात 'जेल'मध्ये दिवाळी सण सासरवाडीला.!!




शोध न्यूज : नुकत्याच लग्न झालेल्या एका नवरोबाची धम्माल कथा बहुचर्चित होऊ लागली असून त्याची सुहागरात जेलमध्येच गेली आणि  दिवाळी सण मात्र वकिलांच्या आशीर्वादाने सासरवाडीला आनंदात साजरा झाला.


कुणावर कधी काय आणि कशी वेळ येईल हे काही सांगता येत नाही, कधी हातून काही चूक घडते तर कधी कधी काही चूक नसतानाही भलतीच शिक्षा भोगावी लागते. माढा तालुक्यातील एका नव्या नवरोबाची देखील अशीच काहीशी अवस्था झाली आणि, लग्न झाल्याचा आनंद फार काळ टिकला नाही, त्याला सुहागरात्र चक्क तुरुंगाच्या गाजासोबत काढावी लागली. पण वकील धावून आले आणि त्यांच्या मदतीने तो बाहेर आला आणि सुहागरात्र जरी तुरुंगात गेली तरी दिवाळी मात्र सासुरवाडीला साजरी करायला मिळाली. हा आनंद साजरा करीत असतानाच तो आता, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वकील ॲड. धनंजय माने आणि ॲड. जयदीप माने यांना लाख लाख धन्यवाद देत आहे, या वकिलांच्या हुशारीने त्याला दिवाळीचा सण तरी मोकळ्या वातावरणात साजरा करायला मिळाला.  या  एकंदर प्रकरणाची कथाच मोठी धम्माल आहे. 


प्रेयसीने केलेल्या आरोपामुळे लग्न झाल्यानंतर सुहागरातच जेलमध्ये  काढाव्या लागलेल्या माढा तालुक्यातील नवविवाहित तरुणाची जामिनावर मुक्तता झाल्यामुळे त्यास सासुरवाडीला पहिल्या दिवाळी सणाचा मानाचा पाहुणचार घेता आला. माढा तालुक्यातील शेटफळ - कुर्डूवाडी रस्त्यावरील एका गावातील तरुणाचा विवाह झाला. दुसऱ्या दिवशी लग्नाच्या पश्चात विधी चालू असतानाच पोलीसची गाडी घरासमोर येऊन थांबली आणि पोलीस गाडीतून नवरदेवाची वरात पोलीस स्टेशनला गेली. नवरदेवाला समजेना काय झाले पोलीस स्टेशनमध्ये त्यास समजले की, त्याच गावातील एका तरुणीने त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली की सदर तरुणाचे माझे दोन वर्षापासून प्रेम संबंध होते काल मी बहिणीच्या घरी गेले असताना आरोपी तेथे आला व त्याने माझ्यावर तसले कृत्य केले त्यास अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आणि नवरदेवास सुहागरात तजेलमध्ये काढावी  लागली पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याने ॲड. धनंजय माने,  ॲड. जयदीप माने यांचे मार्फत बार्शी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. 

ॲड. धनंजय माने,  ॲड. जयदीप माने


आरोपी विरुद्ध करण्यात आलेले सर्व आरोप असंभवनीय आहेत. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी कोणताही नवरदेव परस्त्रीच्या वस्तीवर जाऊन परस्त्रीवर असले कृत्य करणे शक्य नाही. (Got married and went to jail but )आरोपीला या खटल्यात गुंतवण्यात आले आहे असा युक्तिवाद आरोपी पक्षातर्फे न्यायालयात करण्यात आला न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करून आरोपीची जामीन वर मुक्तता करण्याचे आदेश दिले या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने,  ॲड. शरद झालटे यांनी काम पाहिले  सुहागरात पोलीस कोठडीत काढणाऱ्या नवरदेवास न्यायालयाने दिवाळीच्या सुट्टी सुरू होण्याच्या शेवटच्या दिवशी मुक्तता केल्यामुळे सुहागरात जेलमध्ये काढाव्या लागलेल्या नवरदेवास पहिल्या दिवाळी सणाचा सासरचा मानाचा पाहुणचार घेता आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !