BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ मे, २०२२

राज्यातील अनेक जिल्ह्यात आज पावसाची शक्यता !

 



पुणे : यंदा वेळेच्या आधीच पावसाची हजेरी लागणार असून सोलापूर, उस्मानाबाद, पुणे जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 


यावर्षीचा उन्हाळा अत्यंत कडक असून काही भागात पाऊस तर काही भागात उष्णतेची लाट असे विचित्र हवामान सतत राहिले आहे. उष्माघाताचा देखील मोठा त्रास सहन करावा लागत असून तापमान सतत वाढते असल्याने कधी एकदा पावसाला सरुवात होतेय याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. अशी परिस्थितीत आगामी पावसाळा चांगला होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. स्कायमेट या हवामान संस्थेनेही यंदा भरपूर पाऊस होणार असल्याचाच अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात देखील या बातमीने दिलासा दिला असून शेतकरी आनंदित आहेत. त्यातच यंदा पावसाला लवकर सुरुवात होईल असे सांगितले जात आहे. त्यानुसार अंदमान आणि केरळ येथे नियमित वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार आहे.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचे अंदमानात नियमित वेळेच्या आधीच आगमन झाले आहे. मोसमी पावसाचा प्रवास आता केरळच्या दिशेने होत असून  लवकरच  तो महाराष्ट्रात देखील पोहोचणार आहे. त्याआधी येत्या तीन ते चार दिवसात राज्यातील विविध भागात गडगडाटी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. आगामी चार ते पाच दिवसात दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्याचा काही भाग येथे पाऊस होण्याची आणि याचवेळी मध्य महाराष्ट्रात तसेच विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट देखील येण्याशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (Possibility of rain in the state today) राज्यात एकाच वेळी पाऊस आणि उष्णता असे विचित्र हवामान रहाणार आहे. 


आजचा अंदाज 

आज मध्य महाराष्ट्रातील सोलापूर,  कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यांसह विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात तसेच मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पण मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असून या जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन देखील हवामान विभागाने केले आहे.


गुरुवारचा अंदाज 

गुरुवारी १९ मे रोजी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पण विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  


हे देखील वाचा : >>






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !