BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ मे, २०२३

पत्नीच्या वैतागाने पतीनेच केली आत्महत्या ! खिशात सापडली चिट्ठी !


 

शोध न्यूज : पत्नीच्या वागण्याला वैतागून पतीनेच विष प्राशन करून जीवनाचा शेवट केल्याची एका धक्कादायक घटना उघडकीस आली असून खिशातील चिट्ठी आढळून आल्यामुळे या प्रकारचा उलगडा झाला आहे. 


मोहोळ तालुक्यातील औढीं येथील नेताजी हिंदुराव भुसे  याचा विवाह 14 वर्षापुर्वी सोलापूर येथील शुभांगी हिच्यासोबत झाला होता आणि त्यांना दोन मुलेही आहेत. काही काळापासून तो आपल्या पत्नीच्या वर्तनाबद्धल नाराज आणि चिंतेत देखील होता. आपल्या पत्नीचे चुलत भावाशीच अनैतिक संबध असल्याचे त्याच्या निदर्शनास आले होते आणि त्यानंतर त्याने पत्नीला वेळोवेळी समजाऊन सांगण्याचा प्रयत्नही केला होता, कितीही समजाऊन सांगितले तरी पत्नी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे त्याला दिसून आले होते. अखेर त्याने आपल्या खिशात एक चिट्ठी ठेवली आणि विषारी औषध प्रश्न करून आपले आयुष्य संपवले. २३ मे रोजी त्याने आत्महत्या केली. तात्काळ उपचारा करिता सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात नेले  असता डॉक्टरांनी नेताजी भुसे हा उपचारापुर्वीच विषारी औषध प्राशन करून मयत झाला असल्याचे सांगितले. 


तिसऱ्या दिवसाचा विधी झाला तरी या घटनेबाबत नेमके समोर काहीच आले नव्हते पण सत्य कुठेच आणि कधीच लपून राहत नाही. सत्य समोर येण्यास उशीर होतो पण ते बाहेर येतेच. येथेही अगदी तसाच प्रकार घडला. तिसऱ्या दिवसांचा विधी झाल्यानंतर मयत नेताजी यांच्या मुलाला, श्रेयस याला आपल्या पित्याच्या कपड्याच्या खिशात एक चिट्ठी मिळून आली. आणि त्यानंतर एकूण प्रकारचा उलगडा झाला. चिट्ठी वाचल्यावर मुलाला देखील मोठा धक्का बसला. चिठ्ठीत नेताजी याने "मी पत्नी शुभांगी सह ,पांडुरंग द्रोणाचार्य भुसे,आप्पा रामहरी भुसे रा.औढी व राधाअक्का जिवनाथ डुकरे रा. सोलापूर यांनी प्रवृत्त केल्यामुळेच  आत्महत्या करित आसल्याचे उल्लेख केला होता. त्यानुसार मृत नेताजीचे वडील हिंदुराव भुसे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार वरील चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला 


विषारी औषध प्राशन केले असल्याचे लक्षात येताच त्याला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता  तात्काळ उपचारा करिता सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात नेले  असता डॉक्टरांनी नेताजी भुसे हा उपचारापुर्वीच विषारी औषध प्राशन करून मयत झाला असल्याचे सांगितले. 25 मे रोजी तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर नेताजीचा मुलगा श्रेयस याला वडिलाच्या खिशात एक चिठ्ठी आढळुन आली. चिठ्ठीत नेताजी याने "मी पत्नी शुभांगी सह ,पांडुरंग द्रोणाचार्य भुसे,आप्पा रामहरी भुसे रा.औढी व राधाअक्का जिवनाथ डुकरे रा. सोलापूर यांनी प्रवृत्त केल्यामुळेच  आत्महत्या करित आसल्याचे उल्लेख केला होता. त्यानुसार मृत नेताजी चे वडील हिंदुराव भुसे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार वरील चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला, मृताची पत्नी, तिचा प्रियकर व अन्य एक महिला व पुरुष अशा चौघां विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 


पत्नीच्या बदफैली वागणुकीमुळे आणि तिला वारंवार समजावून सांगूनही ती ऐकत नसल्याने निराश झालेल्या पतीने आपलेच जीवन संपवले त्यामुळे मोहोळ तालुक्यात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.  (The husband committed suicide due to his wife's frustration) सात जन्माची सोबत करण्याच्या आणा भाका घेवून एकत्र आलेल्या पत्नीच्या अशा वागण्यामुळे ३७ वर्षाच्या नेताजीला आपल्याच आयुष्याचा शेवट करावा लागला आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !