नागपूर : आपल्या विविध मागण्यासाठी वीज कंपनीच्या अभियंते कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपासल्याने ४८ तासानंतर (Power workers strike) राज्यात विजेचे मोठे संकट उभे राहणार असून ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी देखील हे मान्य केले आहे त्यामुळे वीज पुरवठा ठप्प होण्याची परिस्थिती उद्भवली आहे.
वीज कंपनीचे अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी आणि कामगार (Mahavitaran employees ) आपल्या विविध मागण्या घेऊन आक्रमक झाले असून त्यांनी थेट संपाचे हत्यार बाहेर काढले आहे. अशाच परिस्थितीत ४८ तासानंतर राज्य अंधारात जाण्याची परिस्थिती ओढवली आहे. कोल इंडिया ही संघटना दोन दिवसांच्या संपावर गेलेली असल्यामुळे कोळसा पुरवठा ठप्प होण्याने राज्यात लोड शेडींग करण्याशिवाय पर्यंत उरलेला नाही. त्यामुळे राज्यावर ४८ तासानंतर विजेचे मोठे संकट येऊ घातलेले आहे.
वीज कंपनीचे कर्मचारी आणि कामगार दोन दिवसाच्या संपावर गेले आहेत त्यामुळे वीज यंत्रणा कोलमडून जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या संपाचा मोठा फटका बसण्याची शक्यता असून कोळशाचा पुरवठा न झाल्याने देशपातळीवरील वीज निर्मितीत मोठा व्यत्यय येणार आहे. नाशिक, पारस, भुसावळ येथील वीज निर्मिती ठप्प होण्याची भीती असून कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर येथील वीज निर्मिती करणारे संच देखील प्रभावित होणार आहेत. याचा परिणाम म्हणून राज्यात ४८ तासानंतर विजेचे मोठे संकट निर्माण होऊन भार नियमन करण्याची गरज पडणार आहे. साहजिकच ऐन उन्हाळ्यात विजेचे संकट ( Power supply crisis due to employees strike) उभे राहणार आहे.
ऊर्जामंत्र्यांचा दुजोरा !
विजेच्या संभाव्य संकटबद्धल राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राउत यांनीही दुजोरा दिला आहे. संपामुळे राज्यात वीज संकट उभे असल्याचे राऊत यांनी मान्य केले असून राज्यातील सात औष्णिक वीज केंद्रापैकी पाच केंद्रात केवळ दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. कोळसा पुरवठा करणारी साखळी संपामुळे खंडित झाली आहे त्यामुळे हे संकट येऊ घातले आहे. वीज कर्मचारी यांनी संप मागे घ्यावा यासाठी त्यांच्याशी चर्चा सुरु असून त्यांनी एक पाऊल मागे घ्यावे , आपण एक पाऊल पुढे घेण्यासाठी तयार आहोत अशी विनंती देखील ऊर्जा मंत्र्यांनी संपकरी कर्मचारी याना केली आहे.
जबाबदार कोण ?
राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीला जबाबदार कोण ? असा सवाल देखील आता उपस्थित होऊ लागला आहे. संपाचा इशारा विचारात घेऊन राज्य सरकारने कोळशाबाबत आधीच नियोजन का केले नाही अशी देखील विचारणा आता होऊ लागली आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरु असून विजेची मागणी वाढली आहे तसेच दहावी बारावीच्या परीक्षा सुरु आहेत अशा काळात वीज यंत्रणा कोलमडली तर राज्यातील जनतेचे हाल होणार आहेत
संप मिटला तरीही --
राज्यातील वीज कर्मचारी यांचा संप आज मिटला तरीही लोड शेडींगचे संकट टळणार नाही कारण कोल इंडियाचे कर्मचारी संपावर गेले असून आगामी दोन दिवसात राज्याला कोळशाचा कसलाही पुरवठा होणार नाही. कोळशाच्या अभावी वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार असल्यामुळे विजेचे संकट अटळ असल्याचे सांगितले जात आहे.
मेस्मा लागू
वीज कर्मचारी यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वीज अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी मेस्मा कायदा लागू करून संप करण्यास मनाई केली गेली आहे. राज्यात दहावी आणि बारावी परीक्षा सुरु असून उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे शेतीला पाण्याची अत्यंत गरज आहे त्यामुळे अधिकरी आणि कर्मचारी यांनी संपावर न जाण्याचे आवाहन शासनाने केले आहे.
हे देखील वाचा :
- चोरटी वाळू विकत घेणाराही गोत्यात !
- सोलापूर जिल्ह्यात मागेल त्या शेतकऱ्यास मिळणार कर्ज !
- उजनी धरणातून कालव्यात सोडणार पाणी !
- सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरसह सहा तालुके कोरोनामुक्त !
- अजितदादा पवार म्हणाले, 'नाही तर ते काय घंटा देणार '?
- इशारा ! पुढील पाच दिवसात उष्णतेची लाट !
अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !