BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ ऑग, २०२२

तरुण आरोपीची कोठडीत गळफास घेवून आत्महत्या !

 


मंगळवेढा : येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या तरुण संशयित आरोपीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली या घटनेने असून पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे . 


संशयित आरोपीला पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळते आणि त्याला जामीन न मिळाल्यास उप कारागृहात ठेवले जाते. येथील आरोपीवर लक्ष ठेवण्यासाठी खास पोलीस बंदोबस्त देण्यात येतो. कित्येकादा अशा कोठडीतून आरोपी पळून जातात पण पोलिसांना वेळीच पत्ता लागत नाही. पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेला २१ वर्षे वयाचा संशयित आरोपी सुनील तानाजी किसवे याने मंगळवेढा उप कारागृहात गळफास लावून आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची घटना निदर्शनास आली तेंव्हा सगळ्यांनाच हादरा बसला आणि पोलिसात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेने मंगळवेढा उप कारागृह पुन्हा एकाचा चर्चेत आले आहे. 


मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी येथील २१ वर्षीय सुनील तानाजी किसवे यांच्याविरुद्ध दीड महिन्यांपूर्वी पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. (
Suicide of young accused in custody) न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याला येथील उप कारागृहात ठेवण्यात आले होते. रात्री जेवणानंतर आरोपींची हजेरी घेतली गेली असता एक आरोपी कमी असल्याचे दिसून आले. सदर आरोपीचा शोध सुरु केला असता कोठडीच्या बाजूला कोषागार कार्यालयाच्या बोळात त्याने आत्महत्या केली असल्याचे आढळून आले. मफलरच्या सहाय्याने त्यानेगळफास घेवून आत्महत्या करून आपल्या जीवनाचा शेवट केला होता. या घटनेबाबत तातडीने वरिष्ठ अधिकारी आणि आरोपीच्या नातेवाईकांना देण्यात आली.    


काही क्षणात ही बातमी सगळीकडे पसरू लागली आणि पोलीस दलात तर प्रचंड खळबळ उडाली. संबंधित अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मयत आरोपीचे नातेवाईक देखील पोहोचले. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. सदर आरोपीचा मृतदेह आज सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे. आरोपी पळून जाण्याच्या घटना होत असल्यामुळे कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तरी देखील आरोपीने गळफास लावून आत्महत्या केली आणि हे कुणाच्याही निदर्शनास आले नाही.   


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !