औरंगाबाद : अवकाळी पावसाचा तडाखा कमी होताच राज्यातील तपमानात पुन्हा वाढ होऊ लागली असून ( Temperature Maharashtra) पुढील पाच दिवसात राज्यात काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मार्च महिना संपत आला असतानाचा उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. अवकाळी पाऊस आणि असानी चक्रीवादळ यामुळे वातावरणात बराच बदल झाल्याने गेल्या काही दिवसात राज्यातील विविध भागात पावसाळी हवामान होते शिवाय अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला त्यामुळे तापमानात काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळाले परंतु आता पुन्हा तापमान वाढत असून उन्हाची तीव्रता देखील वाढत चालली आहे. महाराष्ट्रात विदर्भ परिसरात मार्च महीन्याच्या अखेरील सूर्य आग ओकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून राज्याच्या अनेक भागातील तापमानात मोठी वाढ होणार आहे. पुढील पाच दिवसात महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट (Heat wave in Maharashtra) येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पश्चिम हिमालयातील काही भाग आणि गुजराथमध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट धडकण्याची शक्यता असून येत्या चार पाच दिवसात पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ तसेच राजस्थान येथे उन्हाची तीव्रता वाढणार आहे. नंतर २९ ते ३१ मार्च दरम्यान महाराष्ट्र, मराठवाडासह दक्षिण पंजाब, दक्षिण हरियाणा, झारखंड, बिहार, उत्तर मध्य महाराष्ट्रात सूर्य आग ओकण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कालपासून मध्य आणि वायव्य भारतात अनेक ठिकाणी वेगाचे वारे वाहू लागले आहेत तर काही भागात उष्णता अधिक वाढलेली आहे. आगामी पाच दिवस ही उष्णता अधिक वाढणार असल्याने हवामान विभागाने दक्षता घेण्याचा इशारा दिलेला आहे.
महाराष्ट्रात बहुतेक जिल्ह्यात दोन दिवसांपासून कमाल तापमान ४० अंश सेल्सियसपेक्षा अधिक नोंदले गेले आहे. बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांना आज आणि उद्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. दोन दिवसानंतर म्हणजे २९ मार्चच्या नंतर राज्यात उष्णतेची तीव्रता अधिकच वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. औरंगाबाद, जालना, जळगाव, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, अहमदनगर या जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार आहे त्यामुळे या जिल्ह्यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट घोषित केलेंला आहे. ३१ मार्च नंतर उन्हाची तीव्रता किंचित कमी होत्णार असून अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी या जिल्ह्यात मात्र उष्णतेची तीव्रता कायम राहणार आहे. (Five day temperature rise in Maharashtra )महाराष्ट्राचा उर्वरित भागात कमाल तापमान ३५ ते ४० अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा :
- शेतीसाठी जूनपर्यंत मिळणार दोन आवर्तने !
- विठ्ठलभक्त माजी मुख्यमंत्र्यांना सक्तमजुरीची शिक्षा !
- अजितदादा पवार म्हणाले, 'नाही तर ते काय घंटा देणार '?
- उजनी धरणातूनही शेतीसाठी सोडणार पाणी !
अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !