BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ फेब्रु, २०२४

दारूनं केला घात, स्वत:च्या लग्नात वरातील नाचता नाचता नवरदेव झोपला आणि ---

 



शोध न्यूज : आपल्याच लग्नात नवरदेवाला आपल्या पायावर उभे राहता येत नसल्याचे पाहून नवरीच्या पायाखालची जमीन सरकली तर नवरोबाला नवरी मिळण्यापासून मुकावे लागल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.


अलीकडे लग्नात दारूचे संतापजनक फॅड आले असून, नवरदेवाचे मित्र आणि काही नातेवाईक हे देखील दारू पिऊन टाईट असतात. दारूच्या नशेतच ते वरातीत वेडेवाकडे नाचत असतात आणि स्वतः:ला मायकल जॅक्सन समजत असतात. शुभ मंगल कार्याच्या प्रसंगी हे अमंगल चित्र बहुतेक विवाह सोहळ्यात दिसून येऊ लागले आहे. नवरदेव देखील मोठ्या कौतुकाने आपल्या या बेवड्या मित्रांच्या दारूसाठी मोठा खर्च करीत असतो आणि झिंगलेले त्याचे मित्र नाचण्याचा धांगडधिंगा करीत लग्नाचा 'आनंद' उपभोगत असतात. अर्थात यातून अनेक अनुचित घटना घडल्याचेही समोर आले आहे तरी देखील हे प्रकार सर्रास दिसून येत आहेत. अनेकदा नवरा मुलगा देखील  ऐन लग्नाच्या वेळी टाईट झालेला दिसतो. असाच एक नवरदेव आपल्याच लग्नात टाईट झाला आणि यामुळे आपली नवरीही हातची गेल्याचे त्याच्या दुसऱ्या दिवशी लक्षात आले. पण तो पर्यंत सगळे काही घडून गेले होते आणि हाती काहीच उरले नव्हते. 


लग्न करण्यासाठी नवरोबा लग्नस्थळी गाडीतून आला पण तेथे त्याला गाडीतून उतरताहे येत नव्हते आणि गाडीतून बाहेर देखील पडत येत नव्हते. लग्नाला जमलेल्या लोकांनी त्याला कसे बसे गाडीतून बाहेर काढले आणि थेट बेडवर झोपवले. आपले लग्न आहे याचीही त्याला शुद्ध नव्हती की, नेमके काय चाललेय हे देखील त्याला कळत नव्हते. या अख्खी रात्र गेली तरी तो शुद्धीवर आला नाही की त्याचे उंच उडालेले विमान जमिनीवर आलेच नाही. उत्तर प्रदेश मधील फतेहपूर येथे ही घटना घडली आहे. नवरोबाची ही अवस्था पाहून लग्नासाठी आलेले वऱ्हाडी थक्क झाले आणि लग्न न लावताच त्यांनी परतीचा प्रवास सुरु केला. फतेहपूरच्या गाझीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील दारौली येथून लग्नाची मिरवणूक येईपर्यंत येथे सर्व काही ठीक चालले होते. स्वागत समारंभात लग्नातील पाहुण्यांनी जोरदार नृत्य केले. लग्नाची मिरवणूक वधूच्या दारात येताच वराला गाडीतून बाहेर काढण्यासाठी आलेल्या मुलीच्या बाजूच्या लोकांनी वराला नशेत असल्याचे पाहिले. त्याची प्रकृती गाडीतून उतरण्यास योग्य नाही. यानंतर लग्नाच्या मिरवणुकीत आलेल्या लोकांनी त्याला कसेतरी गाडीतून बाहेर काढले आणि कॉटवर झोपवले.


आपल्या होणाऱ्या नवरोबाची ही अवस्था पाहून नवरीने लग्न न करण्याचा आपला निर्णय घोषित केला. पण पिऊन टाईट झालेल्या या  नवरोबाला कशाचीच जाणीव नव्हती की काय घडतेय याचे भान नव्हते. वऱ्हाडी मंडळी निघून गेली, नवरीने लग्नाकडे पाठ फिरवली पण नशेत असलेला नवरोबा रात्रभर गाढ झोपेत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेंव्हा तो शुद्धीवर आला तेंव्हा दारूने आपला कसा घात केला आहे याची जाणीव त्याला झाली. पण आता जाणीव होऊनही काही उपयोग नव्हता. लग्न मंडप उजाड झाला होता. (Groom drunk in marriage. cancel the marriage) नवरीने पाठ फिरवली असली तरी तिच्या वडिलाने या नवरोबाला ओलीस ठेवले आणि लग्नासाठी झालेला खर्च दिल्याशिवाय याला सोडत नाही अशी भूमिका घेतली. त्यांनी पोलिसांना देखील या घटनेची माहिती दिली. पोलीस आले आणि वस्तुस्थिती जाणून घेतली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत दोन्ही बाजूना त्यांनी समजावून सांगत वाद मिटवला तेंव्हा कुठे नवरोबाची सुटका झाली. लग्न न करताच दोन्ही बाजूंची मंडळी आपापल्या मार्गाने मार्गस्थ झाली. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !