BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ मार्च, २०२२

सरकारी कामासाठी डोक्यावर हेल्मेट बंधनकारक !


मुंबई : दुचाकी चालवताना हेल्मेट वापरण्याचा पोलिसांचा आग्रह असतोच पण आता सरकारी कार्यालयात जायचे असेल तर हेल्मेट असणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचा एक आदेशाच राज्य परिवहन आयुक्त यांनी काढला आहे. 


दुचाकी चालवताना डोक्यावर हेल्मेट असणे कायद्यानेच बंधनकारक आहे. अनेक शहरातून हेल्मेट सक्तीला विरोध झाला आहे तर काही शहरात डोक्यावर हेल्मेट नसेल तर पोलीसदादाची शिट्टी वाजते आणि मग गपगुमान खिशात हात घालून दंड भरावा लागतो. अनेक शहरात या नियमाकडे दुर्लक्ष देखील केले जाते. डोक्यावर हेल्मेट नसताना अपघात झाला तर जीव जाण्याचा मोठा धोका असतो त्यामुळे शासन देखील अधूनमधून याबाबत जनजागृती करण्यात येत असते.  आपल्याच सुरक्षेसाठी हेल्मेटचा उपयोग असला तरी बहुतेकजण हेल्मेट वापरायला तयार नसतात पण आता कुठल्याही कामासाठी सरकारी कार्यालयात जायचे असेल तर हेल्मेट असणे (Helmet required to go to government office) बंधनकारक करण्यात आले आहे. 


दुचाकीवरून शासकीय कार्यालयात जाणारे कर्मचारी आणि नागरीक यांच्यासाठी हेल्मेट परिधान करणे आवश्यक करण्यात आले आहे. डोक्यावर हेल्मेट न घालता कुणी दुचाकीवरून शासकीय कार्यालयात कामासाठी दाखल झाला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या मदतीने याबाबत जनजागृती देखील करण्यात येणार आहे परंतु सरकारी कार्यालयात जाणताना नागरिक आणि कर्मचारी यांच्यासाठी हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे.  


कुणालाही सवलत नाही !

रस्त्यावरील विविध अपघातात मृत्यू होत असलेल्यात दुचाकीस्वाराची संख्या अधिक आहे. हेल्मेट नसलेल्यांच्या डोक्याला मार लागून होणाऱ्या मृत्यूची संख्या मोठी आहेच आणि याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ते सुरक्षा समितीने देखील याबाबत चिंता व्यक्त केलेली आहे.  हेल्मेट वापराबाबत वारंवार राज्य परिवहन विभागाकडून जागृती करण्याचे काम केले जाते परंतु हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वरांची संख्या अधिक आहे. यामुळे राज्य परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी कठोर पाउल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी कार्यालयात दुचाकीस्वार  हेल्मेट शिवाय आल्यास त्याच्यावर कारवाई करावी, कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यापासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वावर ही कारवाई करावी, यात कुणालाही सवलत देण्यात येवू नये असे राज्य परिवहन आयुक्त यांनी बजावलेले आहे. 


प्रारंभी जनजागृती !

राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उप प्रादेशिक कार्यालयांना (RTO) याबाबत कळविण्यात आले असून यासाठी जिल्हा प्रशासनाची मदत घेण्यास सांगण्यात आले आहे. प्रारंभी जनजागृती करून नंतर शासकीय कार्यालयात हेल्मेटशिवाय येणाऱ्या दुचाकीस्वारावर कारवाई करण्याची मोहीमच हाती घेण्यात येणार आहे. स्थानिक पोलीस आणि मोटार वाहन विभाग यांच्या वतीने ही कारवाई करण्यात येणार असून त्याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयास अहवाल पाठविण्याची सूचना देखील देण्यात आली आहे.


तरच प्रवेश द्यावा !

दुचाकीवरून येणाऱ्या नागरिकाने हेल्मेट घातले असेल तरच त्यांना कार्यालयाच्या आवारात प्रवेश द्यावा (No access without a helmet) असे आवाहन परिवहन विभागाकडून संबंधीत कार्यालय, संस्था यांना करण्यात येणार आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयासह शैक्षणिक आणि अन्य संस्था यानाही या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. 



हे देखील वाचा :



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !