BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० मार्च, २०२२

भाजपच्या आमदारांची महावितरण अभियंत्याला धमकी !

 



औरंगाबाद : ' अरे नालायकानो, तुमच्या XXX दम आहे का? आमच्या नादी लागू नका---'  अशा भाषेत भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी महावितरण अभियंत्याला (Mahaviraran Emgineer) धमकी दिल्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली असून या प्रकाराने राजकारणात देखील खळबळ उडाली आहे. 


राज्यात काही घडले की भाजप महाविकास आघाडीला जबाबदार धरीत टीका करतो, गेल्या दोन वर्षात सामान्य माणूस देखील उठसुठ केल्या जाणाऱ्या आरोपामुळे त्रस्त झाला आहे.  महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याने जरी काही केले तरी त्याचे भांडवल केले जात असताना भाजपचेच आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महावितरण सहाय्यक अभियंता यांना दमदाटी केली असल्याची घटना समोर आली आहे.  (BJP MLA threatens MSEDCL engineers)  सामान्य नागरिकांनी सरकारी कर्मचारी, अधिकारी यांना थोडेसे काही बोलले तरी लगेच त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला जातो. लोणीकर यांनी तर थेट धमकी दिली असल्याची एक क्लिप बाहेर आली आहे.  लोणीकर यांनी मात्र इन्कार केला आहे.


वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याला शिवीगाळ केल्याची ही क्लिप समाजमाध्यमावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागली आहे आणि ती ऐकणाऱ्याला धक्का बसत आहे. माई मंत्री असलेल्या लोकप्रतिनिधींच्या तोंडी शासकीय अधिकाऱ्यांच्या संदर्भात असलेली भाषा ही नक्कीच धक्कादायक आहे. बंगल्यातील वीज मीटर काढून नेल्यामुळे ह प्रकार घडला असल्याने या संवादावरून दिसत आहे. ' आम्ही मीटर काढून नेलेले नाही, तरीही चौकशी करतो, तीन लाखांचे बिल थकीत आहे त्यामुळे दोनदा येवून गेलो' असे महावितरण अधिकारी सांगत आहेत परंतु आमदार लोणीकर हे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे. अखेर 'अशी भाषा बोलू नका' अशी विनंती देखील या महावितरण अधिकाऱ्याने केली असल्याचे या क्लिपमधून ऐकायला मिळत आहे.


सामान्य ग्राहकांचे थोडेसे वीज बिल थकले तरी त्यांचा वीज पुरवठा तोडला जातो. उभी पिके जळत असताना देखील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने राबवली असून अजूनही घरगुती वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तोडला जात आहे.  भाजप आमदारांचे तर तीन लाख रुपयांचे वीज बिल थकले असल्याचे या संवादातून स्पष्ट होत असूनही  महावितरण अधिकारी यांनाच दमदाटी आणि धमकी दिली जात असल्याचे दिसत आहे. असा प्रकार सामान्य ग्राहकांनी केला असता तर तो कुणीच खपवून घेतला नसता आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी अथवा आमदारांनी केला असता तर भाजपने रान उठवले असते. 

क्लिप बनावट !
आपल्या नावाने व्हायरल झालेली ऑडीओ क्लिप ही बनावट असून आपली बदनामी करण्याचा कट असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले आहे. 

अशी आहे भाषा! 
"अरे नालायकांनोआम्ही बिलं भरतोमी १० लाख बिल भरतो औरंगाबादचे ! तुमच्या XXX मध्ये दम आहे का हिंमत असेल तर झोपडपट्टीत जालोक आकडे टाकतात.... तुला एका मिनिटात घरी पाठवीनमाज चढला का घोडे लावू शकतोसस्पेंड करू शकतोतुम्हाला नीट करू शकतो. मीटर काढून नेले आणि तू नाही कसं काय म्हणू शकतो. आयकरइन्कमटॅक्सच्या धाडी टाकीनतुम्ही कुठे काय काय प्रॉपर्टी घेतली. कुठं कुठं पैसे कमावले. कुठं चोऱ्या करताआम्हीही कुंडल्या ठेवतो तुमच्या. आमच्या नादी लागू नका !

पैसे भरणारे आम्ही आहोतआमच्यावर सूड उगवू नका. माझे दोन बंगले आहेतएका बंगल्याचे मीटर काढून नेले आहे. आम्ही राहत नाहीतरीही बिल भरतो. जालन्याच्या कलेक्टरला तीन तास कोंडले होते हे लक्षात ठेव. ऊर्जामंत्रीही माझे नातेवाईक आहेतउद्या एक कम्प्लेंट पाठवली तर सस्पेंड करतील."


गुन्हा दाखल करणार ?

सामान्य ग्राहकांना लगेच कायदा दाखविणारे महावितरण आता भाजप आमदारांच्या बाबतीत काय पाउल उचलणार? गुन्हा दाखल करणार की आमदार आहेत म्हणून अपमान गिळून गप्प बसणार ? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. दरम्यान याबाबत गुन्हा दाखल करण्याचा इशारा तरी महावितरण अधिकाऱ्यांनी दिला आहे. आता प्रत्यक्षात काय केले जातेय याकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. दरम्यान लोणीकर यांनी या प्रकारचा इन्कार केला असून हे आरोप फेटाळून लावले आहेत.  


हे देखील वाचा :






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !