ठाणे: पोट दुखत असल्याने महिलेला प्रसूती शस्त्रक्रिया केल्यानंतर खूपच त्रास होत होता, अखेर डॉक्टरांनी मनावर घेवून तपासणी केली असता या महिलेच्या पोटात चक्क कापडी बोळा राहिला (Foreign body in the stomach) असल्याचे लक्षात आले आणि नंतर तो काढण्यात देखील आला.
डॉक्टरना देवाचं दुसरं रूप मानलं जातं पण कधीकधी काही चूक घडते आणि रुग्णाला जीवदान मिळण्याऐवजी मृत्यूला कवटाळावे लागते अशाही काही घटना घडल्याचे समोर येते. शस्त्रक्रिया करताना रुग्णाच्या पोटात काही कात्री तर कधी अन्य काही वस्तू तशाच राहिलेल्या असल्याचे दुसऱ्या शस्त्रक्रिया केल्यावर निदर्शनास आल्याच्याही काही घटना समोर आल्या आहेत. डॉक्टर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठीच प्रयत्न करीत असतात पण कधी काही चूक घडते आणि त्याचा मोठा फटका रुग्णाला बसतो. बाळंतपणासाठी रुग्णालयात आलेल्या एका महिलेच्या पोटात चक्क कापडी बोळा तसाच राहून गेला आणि त्याचा मोठा शारीरिक आणि मानसिक त्रास या महिलेला सहन करावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे.
ठाण्यातील वर्तकनगर मधील एक नामांकित रुग्णालयात ३१ वर्षे वयाची एक महिला बाळंतपणासाठी दाखल झाली. रुग्णालयाने प्रसूतीसाठी सिझेरियन केले. यानंतर सदर महिलेच्या पोटात वेदना होत राहिल्या. या वेदना असह्य असल्याने महिलेने डॉक्टरांच्या निदर्शनास आणले पण संबंधित डॉक्टर याकडे दुर्लक्ष करीत राहिले असा आरोप या महिलेने केला आहे. अखेर या महिलेचा त्रास अधिकच वाढत गेला आणि डॉक्टरांनी दुसऱ्यांदा एक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मात्र डॉक्टरांना घाम फुटला. सिझेरियन करताना योग्य काळजी न घेतल्याने महिलेच्या पोटात कापडाचा एक बोळा तसाच राहिला होता (doctor's-fault-foreign-body-in-woman's-stomach) हे यावेळी दिसून आले.
गंभीर प्रकरण
महिला प्रसूतीसाठी या रुग्णालयात दाखल झाली होती पण यावेळी सिझेरियन (Cesarean Oparation) करण्यात आले पण हे करताना महिलेच्या पोटात कापडी बोळा तसाच राहिला. हे प्रकरण आणि कुणाचे तरी दुर्लक्ष मृण्मयी दिवेकर यांच्या जीवावर देखील बेतू शकत होता. महिलेने त्रास होत असल्याची अनेकदा तक्रार करूनही त्याकडे डोळेझाक करण्यात येत होती पण उशिरा का होईना याकडे गंभीरपणे पहिले म्हणून महिलेचा जीव तरी वाचला !
महिलेला दुखापत !
डॉक्टरांनी सिझेरियन नंतर दुसरी शस्त्रक्रिया करून पाहणी केली असताना महिलेच्या पोटात कापडी बोळा तसाच राहिला असल्याचे लक्षात आले आणि तो काढून टाकण्यात आला पण एवढ्यावर हे प्रकरण थांबले नाही तर महिलेला कायमची मोठी दुखापत झाली आहे. महिलेच्या पोटातील आतडी आणि अंडाशय, अंडाशयाची उजवी नळी चिकटून गंभीर स्वरुपाची दुखापत झाली आहे. त्यांच्या उजव्या बाजूची अंडाशयाची नळी काढून टाकण्याची वेळ आली.
पोलिसात गुन्हा !
महिलेच्या बाबतीत घडलेल्या या प्रकरणी सदर नामांकित रुग्णालयाचे डॉक्टर अडचणीत आले असून वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसूती करणारे डॉक्टर, त्यांचे सहकारी अशा चार जणांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात भूलदज्ञ आणि नर्स यांचाही समावेश आहे.
म्हणून प्राण वाचले !
बाळाच्या हृदयाचे ठोके वेगाने कमी होते म्हणून आई आणि बाळाचा जीव वाचविण्यासाठी तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली, रक्तस्त्राव देखील खूप होत होता म्हणून गर्भाशय काढून टाकणे प्रतिबंधित करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आणि हे सगळे तत्परतेने केल्यामुळे आई आणि बाळ वाचले असल्याचे रुग्णालय सांगत आहे पण कापडाच्या बोळ्याचे काय ? हा मुद्दा मात्र बाजूलाच ठेवला असल्याने दिसून आले . पोलीस चौकशीत सगळ्या बाबी पुढे येतील.
हे देखील वाचा :
- महिलेच्या पोटात राहिला कापडाचा बोळा, डॉक्टर गोत्यात !
- ऊसाच्या बिलातून होणार शेतकऱ्याच्या कर्जाची वसुली !
- साखर कारखाने निवडणूक प्रक्रिया सुरु !
- सोलापूर जिल्ह्यतील आणखी एका तरुण शेतकऱ्याची आत्महत्या !
- सोलापूर जिल्ह्यात उन्हाळ्यात शाळा, वेळेत मात्र बदल !
- शाळेतील खिचडीत पालीचे तुकडे, विद्यार्थ्यांना विषबाधा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !