BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ जाने, २०२२

दुर्घटना ! पर्यटकासह मच्छिमारही उजनी जलाशयात बुडाला !

 



चिखलठाण : उजनी धरणात पर्यटनासाठी आलेला मुंबईचा युवक बडताना पाहून त्याला वाचविण्यासाठी झेपावलेल्या मच्छीमारालाही जलसमाधी मिळाली असून या घटनने करमाळा तालुक्यात हळहळ  व्यक्त होत आहे. 


उजनी जलाशयात पर्यटनास गेलेल्या अनेक पर्यटकांना जलसमाधी मिळाली आहे पण आज एका पर्यटकाला वाचवताना स्थानिक मच्छिमाराचा बळी गेला आहे. ऐन संक्रांतीच्या सणादिवशी गावावर शोकाकुल होण्याची वेळ आली आहे. मुंबईहून खास पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा जलाशयात फेरफटका मारताना तोल गेला आणि मुंबईचा हा पर्यटक जलाशयात पडला. तो बुडू लागल्याचे दिसताच त्याला वाचविण्यासाठी मच्छिमाराने पाण्यात उडी घेतली. बुडणाऱ्या युवकाने त्याची मदत घेत आपला जीव वाचाविण्याऐवजी घाबरलेल्या युवकाने थेट मच्चीमाराला मिठी मारली आणि त्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. 


चिखलठाण येथील २९ वर्षे वयाचा तरुण समीर याकुब सय्यद हा मच्छिमारीचा व्यवसाय करतो. समीरकडे मुंबईतील पाहुणे आल्याने ते सकाळी त्याच्यासोबत फेरफटका मारण्यासाठी समीर सोबत गेले. चार पाहुण्यांना होडीत घेवून समीर जलाशयात फेरफटका मारीत असताना १८ वर्षे वयाचा अल्ताफ इक्बाल शेख हा मुंबईहून आलेला तरुण तोल गेल्याने होडीतून जलाशयात पडला. त्याला वाचविण्यासाठी समीरने पाण्यात उडी घेतली. समीर याच जलाशयात मासेमारी करीत होता आणि पोहण्यात तरबेज होता पण बुडणाऱ्या युवकाने समीरला मिठी मारली. त्याने मारलेल्या मिठीमुळे त्या युवकाला वाचविणे दूरच पण स्वत: वाचणेही कठीण झाले. काही क्षणात दोघेही पाण्यात बुडाले आणि दिसेनासे झाले. होडीतील बाकीच्या लोकांनी आरडओरड केली तेंव्हा आजुबाजूचे मच्छिमार धावत मदतीला आले पण तोपर्यंत दोघेही बुडाले होते आणि त्यांचा कसलाही थावाठीकाणा मिळत नव्हता. 


जलाशयाच्या जवळच गाव असल्याने ही बातमी वेगाने गावात पोहोचली आणि गावकरी गोळा झाले. आजूबाजूच्या गावातील मच्छिमार येऊन त्यांनीही शोध घेतला पण दोघांचा काहीच पत्ता लागला नाही. पोलिसांना माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी धाऊन आले आहेत. स्थानिक लोक, मच्छिमार आदींच्या मदतीने शोधकार्य सुरु करण्यात आले आहे.  ऐन संक्रातीच्या दिवशीच गाव शोकात बुडाले असून यापूर्वीही अशा घटना जलाशयात घडल्या आहेत. आजच्या घटनेने प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. 


हे वाचाच :> अजित पवारांचा पी ए बोलतोय, वीस लाख रुपये दे !

) भाजपला धक्का देत शरद पवार यांची मोठी खेळी यशस्वी !

३ पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण !

तंगाट गडी घुसला थेट साहेबांच्याच ऑफिसमध्ये !

५ ) सोलापूर सिव्हील च्या ४१ डॉक्टरना कोरोनाची बाधा

६) बस धावत होती, चालकाला आली फीट आणि केले डोळे पांढरे --

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !