BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० मार्च, २०२२

शरद पवार म्हणाले, "तैय्यार है हम" !

 



मुंबई : पाच राज्यातील निवडणुकांचा संपूर्ण निकाल घोषित होण्याआधीच भाजपने महाराष्ट्राला छेडायला सुरुवात केली आणि त्यांना 'तैय्यार है हम" म्हणत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार ( Sharad Pawar) यांनी जोरदार खुले आव्हान दिले आहे.

देशातील पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल आज घोषित होत असताना पाच पैकी चार राज्यात भाजपला यश मिळत आहे. निवडणुकीत यश मिळाल्याने आनंद साजरा करणे स्वाभाविक आहे त्यानुसार राज्यातील भाजपने देखील हा आनंद साजरा केला. पण या यशामुळे हुरळून गेलेल्या काही नेत्यांनी महाराष्ट्राकडे बोट दाखवत महाविकास आघाडीला छेडण्याचा प्रयत्न केला. "ये तो सिफ झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है" अशा घोषणा भाजपाच्या घोषणा देखील महाराष्ट्रात उमटल्या. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार  यांनी देखील " तैय्यार है हम" असे म्हणत निवडणुकीसाठी समर्थ असल्याचे दाखवून दिले. एकप्रकारे पवार यांनी भाजपला खुले आव्हानच दिले आहे.


'--महाराष्ट्र अभी बाकी है" या भाजपच्या घोषणेबाबत त्यांना विचारले असता त्यांनी केवळ एका शब्दात ही घोषणा परतवून लावली आहे. पाच राज्यातील निवडणुकींच्या निकालाबाबत शरद पवार हे वृत्तवाहिनीशी बोलत होते. पंजाबमधून काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला आणि तेथे आम आदमी पार्टीने घवघवीत यश मिळवले. दिल्लीनंतर आता 'आम आदमी' ने पंजाब देखील काबीज केला असल्याचे या निवडणूक निकालात समोर आले आहे. यावर बोलताना पवार यांनी 'आम आदमी' चे कौतुक देखील केले आहे. दिल्लीमध्ये आप सरकारने नागरिकांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत त्याचा पंजाब निवडणुकीत चांगला फायदा झाला आहे असे पवार यांनी सांगितले. 


पाच राज्यातील या निवडणूक निकालाच्या नंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आणखी कष्ट घेईल. महाराष्ट्रातील सरकार पूर्ण काल टिकणार आहेच पण पुन्हा सत्तेवर देखील येईल असा विश्वास देखील शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. पाचही राज्यातील निवडणुकीत काँग्रेसची पीछेहाट झाली आहे. पंजाबमध्येही काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. याबाबत विचारले असता 'पाच राज्यात काँग्रेस कुठे कमी पडली यावर मी प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही पण पराभवामुळे नाउमेद होण्याची आवश्यकता नाही. पंजाबमधील काँग्रेसची परिस्थिती चांगली होती पण पंजाबमध्ये करण्यात आलेले बदल जनतेने स्वीकारले नाहीत असे देशात असल्याचे पवार यांनी सांगितले. 


उत्तर प्रदेशमध्ये भाजपला यश मिळाले असले तरी या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांना मिळालेले यश नजरेआड करण्यासारखे नाही. आता विरोधकांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे याचाही विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पराभवाने काँग्रेस पक्षाने खचून जाण्याची गरज नाही, १९७७ साली देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, सर्वच राज्यात काँग्रेस हरली होती त्यावेळी पक्ष संपल्याचे अनेकांनी म्हटले होते पण पुन्हा काँग्रेस पक्ष पुढे आला. राजकारण म्हटलं की पक्ष कधी न कधी हरत असतो, त्यामुळे फार निराश होण्याची गरज नसते असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. (Five State Election)   


आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात देखील भाजपचे सरकार येईल, महाविकास आघाडीचे सरकार मध्येच पडले तर त्यावेळी देखील भाजपचे सरकार महाराष्ट्रात येईल असे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निकालानंतर बोलताना म्हटले आहे.  

हे देखील वाचा :


वाचा : शिक्षकाची आत्महत्या नव्हे, बायकोनेच काढला काटा !  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !