BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ जाने, २०२२

आली, अखेर कोरोनाची तिसरी लाट येऊन धडकली !

 



जालना  : कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली की नाही याबाबत रोज मतमतांतरे येत असली तरी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत स्पष्ट भाष्य केले असून कोरोनाच्या तिसर्या लाटेला सुरुवात झाली असल्याचे म्हटले आहे.

कोरोनाची दुसरी लाट प्रभावी असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु झाली होती. याबाबत अभ्यासकांत एकमत नव्हते आणि दुसरी लाट ओसरत चालली तरी तिसऱ्या लाटेची चाहूलही लागलेली नव्हती त्यामुळे तिसरी लाट आता येणार नाही असेच मत व्यक्त होऊ लागले होते. तिसरी लाट येणारच नाही असाही मतप्रवाह होता पण चोरपावलाने तिसरी लाट आली आणि ती दुसरीपेक्षा अधिक वेगवान निघाली. गेल्या काही दिवसात तिसरी लाट सुरु झाल्याचे काही मंत्री सांगत होते तर अभ्यासक मात्र तिसरी लाट लवकरच येईल असे सांगत होते त्यामुळे या लाटेबाबत संभ्रम कायम होता. आज मात्र राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनीच यावर स्पष्ट भाष्य केले आणि तिसरी लाट सुरु झाली असल्याचे सांगून टाकले. 


कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असून या लाटेचा प्रभाव आणि प्रादुर्भाव कधीपर्यंत राहील हे मात्र सांगता येत नाही. असे असले तरी जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ही लाट कायम राहील असा अंदाज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. जालना येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे, त्यामुळे आता तिसरी लाट सुरु झाल्याचे अधिकृतपणे सांगता येणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आलेला असल्याने पालकांनी समजून घेऊन शासनाला सहकार्य करावे असे आवाहनही राजेश टोपे यांनी केले आहे.


शासन कोरोनाच्या प्रतिबंधासाठी विविध नियम आणि निर्बंध ठरवते पण राजकीय नेते हे नियम पाळत नाही असे वारंवार दिसून येते. महिनाभर तरी राजकीय पक्षांनी आपले कार्यक्रम थांबवावेत आणि सर्वांनीच कोरोनाचे नियम काटेकोरपाने पाळावेत असे आवर्जून राजेश टोपे म्हणाले. लोकांची काळजी घेणे ही शासनाची जबाबदारी असून 'जान है तो जहान है', उद्योग व्यवसाय सुरु राहिले पाहिजेत पण काळजी घेणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. राज्यात जिल्हा स्तरावर होम आयसोलेशन कित तयार करण्यात येणार असून कोरोना टेस्टिंग देखील वाढविण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.  


येथे क्लिक करा > उजनी धरणात बुडून दोघांचा मृत्यू !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !