BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ जाने, २०२२

अजित पवार यांचा पीए बोलतोय, वीस लाख रुपये दे !

 



पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या नावाने आणि त्यांच्याच मोबाईल क्रमांकाचा वापर करू बिल्डरला २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली असून या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. 


राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्पष्टवक्ते तर आहेतच पण चुकीचे काम झाले तर ते प्रचंड संतापतात. ठेकेदार असो की अधिकारी, खास आपल्या स्टाईलने त्याची 'धुलाई' करतात. परंतु अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकावरून पुण्यातील एका बिल्डरला फोन करून तब्बल २० लाखाची खंडणी मागण्यात आली असल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आल्याने खळबळ उडणे स्वाभाविक आहे. कुणीतरी अजित पवार बोलतोय म्हणून फसवणूक करणे वेगळे पण थेट त्यांच्याच मोबाईल क्रमांकावरून बिल्डरला खंडणीचा फोन जाणे हे तितकेच धक्कादायक आणि खळबळजनक आहे. 'तुमचा प्रोजेक्ट गावात होऊ देणार नाही' अशी धमकी देत ही खंडणी मागण्यात आली आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक देखील करण्यात आली आहे.  


सदर प्रकरणी बिल्डरने पोलिसात फिर्याद दिलेली असून संशयित आरोपींनी प्ले स्टोअरवरून 'फेक कॉल अप' हे ऍप डाऊनलोड केले आणि त्याच्या द्वारे अजित पवार  यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून बिल्डरला फोन करण्यात आला आणि धमकी देत खंडणीची मागणी करण्यात आली. आपण अजित पवार यांचा पी ए चौबे बोलत असल्याचे बिल्डरला सांगण्यात आले. हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई येथील शिरसाटवाडी येथील जागेचा वाद मिटवून टाका. गावात तुमचा प्रोजेक्ट होणार नाही अशी धमकी देत २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. 


सदर बिल्डरने याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असून पोलिसांनी अत्यंत वेगाने या प्रकारचा तपास केला आणि सहा जणांना अटक देखील केली आहे. हवेली येथील नवनाथ भाऊसाहेब चोरमले, (वय २८), सौरभ नारायण काकडे (वय २०), सुनील गौतम वाघमारे (वय २८)  किरण रामभाऊ काकडे (वय २५) चैतन्य राजेंद्र वाघमारे (वय १९), आकाश शरद निकाळजे (वय २४) या सहा जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. मागील दहा दिवसांपासून हा प्रकार सुरु होता.  पोलिसांच्या चपळाईने एक मोठा गैरप्रकार उघडकीस आला असून आणखी किती मंत्री  अथवा नेत्यांच्या नावाने असे प्रकार केले असतील याचे उत्तर मिळण्यासाठी पोलीस तपास पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार आहे. 



हे वाचलत का? > पंढरपूर पोलिसांनी पकडले आठशे बेफिकीर !

) भाजपला धक्का देत शरद पवार यांची मोठी खेळी यशस्वी !

३ पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण !

) तंगाट गडी घुसला थेट साहेबांच्याच ऑफिसमध्ये !

) सोलापूर सिव्हील च्या ४१ डॉक्टरना कोरोनाची बाधा







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !