BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ जाने, २०२२

सोलापूर जिल्ह्यात २४ तासात वाढले पावणे चारशे रुग्ण !


 

सोलापूर : राज्यातील विविध भागासोबत सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढत असून मागील २४ तासात सोलापूर जिल्ह्यात नवे ३७१ कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत.  

देशपातळीवर आणि राज्यात कोरोना उद्रेकाच्या दिशेने निघाला असताना मागील २४ तासात राज्यात तब्बल ४६ हजार ४०६ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे तर ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. ओमीक्रॉनचा मात्र एकही रुग्ण काल आढळलेला नाही एवढीच काय ती दिलासादायक बाब ठरली आहे. राज्यात सक्रिय रुग्णची संख्या आता २ लाख ५१ हजार ८२८ एवढी झाली असून राज्यातील एकूण बाधितांची संख्या ७० लाख ८१ हजार ६७ एवढी झाली आहे. आत्तापर्यंत १ लाख ४१ हजार ७३७ नागरिकांचा बळी कोरोनाने घेतला आहे. नव्याने आलेल्या ओमीक्रॉन रुग्णाची संख्या देखील १ हजार ३६७ वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि वेग पाहता येत्या काही दिवसात कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती आणि शक्यता व्यक्त होत आहे. नागरिकांनी वेळेत धोका ओळखून खबरदारीचे सगळे उपाय योजण्याची गरज आहे. 


राज्याच्या विविध भागात कोरोनाचा प्रकोप पहायला मिळत असताना सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत ही वाढ पोहोचलेली आहे. सोलापूर शहरात ६१६ तर ग्रामीण भागात ५५७ सक्रिय रुग्ण सद्या आहेत. मागील २४ तासात सोलापूर शहरात २१७ आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १५४ असे नवे ३७१ रुग्ण आढळून आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात झालेल्या १ हजार ६२ चाचण्यांत १५४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक ३४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. अक्कलकोट तालुका ( ६ ),  बार्शी तालुका  तालुका  (३१), करमाळा  तालुका  (१२  ), माढा  तालुका  ( २४),  माळशिरस तालुका  (१२), मंगळवेढा तालुका (११),  मोहोळ तालुका (६), उत्तर सोलापूर (६), सांगोला तालुका (३), दक्षिण सोलापूर तालुका (९)  अशा रुग्णांचा समावेश आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पंढरपूर तालुका जिल्ह्यात पुढे होता. पंढरपूर तालुक्यात मागील दोन्ही लाटेत जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण होते आणि मृत्यूंची संख्याही जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातच सर्वाधिक आहे. आत्ताही पंढरपूरचे आकडे अन्य तालुक्यांच्या तुलनेत वाढताना दिसत आहेत.


२७ डिसेंबर २०२१ रोजी संपूर्ण भारतात कोरोनाचे ८१ हजार ९०६ कोरोना बाधित होते तो आकडा आता ११ लाख १७ हजार रुग्णांवर पोहोचला आहे. जगभरात ही वाढ सुरु असून सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत आहेत. ब्रिटनमध्ये मात्र दिलासा मिळू लागला असून रुग्णसंख्येत मागील आठवड्यात तुलनेत ५९ टक्क्यांनी घट झाली आहे. ब्रिटन येथे १५ डिसेंबरच्या नंतर ओमीक्रॉनचा उद्रेक सुरु झाला होता आणि २५ दिवसांनी तो कमी कमी होत निघाला आहे. भारतात ३१ डिसेंबरपासून उद्रेकाला सुरुवात झाली असून जानेवारी महिन्याच्या अंतिम आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या मध्यात हा उद्रेक कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सद्यस्थितीत मात्र खबरदारी हा एकाच प्रभावी उपाय दिसून येत आहे. 


हे वाचलत का? > पंढरपूर पोलिसांनी पकडले आठशे बेफिकीर !

) भाजपला धक्का देत शरद पवार यांची मोठी खेळी यशस्वी !




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !