BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ जाने, २०२२

धावत्या बसच्या चालकाला आली फीट, रणरागिणी आली धावून आणि -

 




पुणे : बावीस महिलांना घेऊन निघालेल्या बसच्या चालकाला अचानक आली फीट आणि त्याने डोळे पांढरे केले त्यामुळे बसमधील महिलांच्या काळजाचा ठोका चुकला पण त्याच बसमधून प्रवास करीत असलेल्या एका रणरागिणीने स्टेअरिंगचा ताबा घेतला. 


महिला आज सर्वच कक्षेत्रात आघाडीवर आहेत पण तरीदेखील काही लोक नाकं मुरडतच असतात. कुठे जायचे म्हटले तरी महिलेला एकटे पाठवायला तयार होत नाहीत किंवा महिला काही करायला गेली की 'हे बायकांचं काम नाही' असं हिणवलं जात. प्रत्यक्षात महिला जे करते ते कित्येकदा पुरुषानाही जमत नाही आणि महिलांनी कुठलं क्षेत्र शिल्लक ठेवलेलाही नाही. विमानापासून ट्रक चालाविण्यापर्यंत महिला पुढे असून ती अंतराळात देखील जाऊन आली आहे पण पुरुषी मानसिकता काही बदलत नाही. अशा मानसिकतेला वठणीवर आणण्याचेच काम या महिलेने केले आहे. पुण्यातील एक महिला बस चालवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला पण महिला आता ट्रक, बस चालवतातच, त्यात काही विशेष राहिलं नाही म्हणून अनेकांनी हे सहज घेतलं. जेंव्हा या मागचं सत्य बाहेर आलं तेंव्हा अनेकांनी आ वासून पाहिलं !


पुणे - अहमदनगर रस्त्यावरील एका थरारक प्रसंगाचा हा व्हिडीओ आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यातून २२ महिलांचा एक ग्रुप मोराची चिचोली येथे फिरल्या निघाला होता. या महिला एका बसमधून प्रवास करीत होत्या. बस धावत असतानाच बस चालकाला फीट आली आणि त्याने डोळे पांढरे केले. हा प्रकार अनेक महिलांनी पहिला आणि सगळ्यांच्याच काळजाचा ठीक चुकला. महिलांनी प्रसंगावधान राखत चालकाला जमेल तशी गाडी बाजूला घेण्यास सांगितले आणि त्याप्रमाणे चालकाने त्यांची सूचना ऐकली. याचवेळी याच बसमधून प्रवास करीत असलेल्या ४० वर्षे वयाच्या योगिता सातव पदर खोचून पुढे सरसावल्या आणि मोठ्या हिमतीने बसचे स्टेअरिंग आपल्या हाती घेतले. तब्बल दहा किलोमीटर बस चालवत योगिता सातव यांनी बस रुग्णालयापर्यंत आणली आणि चालकाला उपचारासाठी दाखल केले. 


प्रसंग अगदीच बिकट होता पण बसमधील महिला आणि डोळे पांढरे करून बाजूला कोसळलेला चालक यांचे प्राण वाचणे महत्वाचे होते. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत स्टेअरिंगचा ताबा घेतला असं योगिता सातव यांनी सांगितलं.  क्षणाचाही विलंब न लावता योगिता सातव मोठ्या हिमतीने पुढे सरसावल्या. सातव या काही बस चालक नव्हत्या की त्यांनी कधी बस चालवलेली देखील नव्हती. कार चालविण्याचा त्यांना अनुभव होता आणि त्याच बळावर त्यांनी एवढी मोठी हिम्मत दाखवली होती. बसचे स्टेअरिंग हातात घेण्याची कधी वेळ आलीच नव्हती पण त्यांनी महिलांचे आणि चालकांचेही प्राण वाचवले. यामुळे योगिनी सातव यांचे प्रचंड कौतुक होत आहे. 



हे वाचाच :> अजित पवारांचा पी ए बोलतोय, वीस लाख रुपये दे !

) भाजपला धक्का देत शरद पवार यांची मोठी खेळी यशस्वी !

३ पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण !

तंगाट गडी घुसला थेट साहेबांच्याच ऑफिसमध्ये !

५ ) सोलापूर सिव्हील च्या ४१ डॉक्टरना कोरोनाची बाधा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !