BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ जाने, २०२२

'झिंगाट' झालेला बहाद्दर घुसला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात !

 



पंढरपूर : पोलीस दिसले की भले भले बेवडे सरळ होतात पण एका तळीरामाने पंढरपूर येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याच कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला आणि तेथे त्याने पोलिसांशी हुज्जत घातली. पहिल्यांदाच असा अजब प्रकार समोर आला आहे.   


समोर पोलीस दिसला की रस्त्यावर तर्रर होऊन वाकडे तिकडे चालणारे सरळ रेषेत चालायला लागतात पण या तळीराम महाशयांनी वाट वाकडी करून पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाण्याचे धाडस केले. ते देखील थेट उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्याच कार्यालयात ! नशेत काही कळत नसल्याचे दाखवत असलेला बेवडा पोलीस मात्र लगेच ओळखतो आणि तोंडाची बडबड आपोआप शांत होते. पोलीसदादाला खुश करण्यासाठी काही तळीराम पोलिसांना कडक सॅल्यूट देखील ठोकतात आणि पोलिसांनाच दारूचे दुष्परिणाम पटवून द्यायला लागतात. करकंब येथील एक तळीराम मात्र या सगळ्यांपेक्षा वेगळा निघाला आणि पोलिसांच्या कार्यालयात जाऊन त्यांना ज्ञान देण्याचा पराक्रम त्याने केला. अर्थातच पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 


करकंब येथील ४० वर्षीय अमर पांडुरंग खारे  याने दारूच्या नशेत थेट पंढरपूर येथील उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गाठले आणि क्राईम विभागात जाऊन त्याने बडबड सुरु केली. नशेत तो इथपर्यंत आला तो नक्की काहीतरी कामासाठी आला असावा असे साहजिकच कुणालाही वाटेल. कार्यालयात आपल्या कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला 'काय काम आहे ?' अशी विचारणा देखील केली. काहीच काम नसताना कोण क्षसला पोलिसांच्या कार्यालयात जाईल ? पोलिसाने त्याला काम विचारले पण 'आपले काहीच काम नाही' असे त्यांनी सांगितले. काहीच काम नाही तर मग कार्यालयात कशाला आला?  काही काम नाही म्हणत हा तळीराम पुन्हा तिथंच आपला तोल सांभाळत उभा होता. पोलिसांना त्याच्या तोंडाला दारूचा वास आला,  पोलिसांनी त्याला बाहेर जाऊन थांबायला सांगितले पण ओट बाहेरही जायला तयार नव्हता. पोलीस त्याला समजावून सांगत होते पण हा पठ्ठ्या कुणाचं काही ऐकायला तयार नव्हता. करकंब येथून आल्यावर बस स्थानकापासून तो रिक्षाने उप विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत आला होता, रिक्षाचे भाडे दिले नसल्याने रिक्षा तशीच बाहेर उभी होती. 


पोलिसांशी हुज्जत घालून काही वेळाने तो कार्यालयाच्या बाहेर आला पण बाहेर आल्यावर त्याचा 'आवाज' वाढला. तोंडाला येईल तसे मोठमोठ्याने बोलत राहिला. अखेर तेथील पोलिसानी शहर पोलिसांना बोलावून घेतले. शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन उप जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेले. त्याची रुग्णालयात तपासणी केली असता त्याने मद्यार्काचे सेवन केले असल्याचे स्पष्ट झाले. अखेर शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तळीरामाच्या अनेक तऱ्हा असतात पण हा तळीराम इतरांपेक्षा वेगळाच निघाला. गुन्हा दाखल झाल्यावर मात्र त्याचे भरकटलेले 'विमान' धावपट्टीवर उतरले पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.  


हे वाचलत का? > पंढरपूर पोलिसांनी पकडले आठशे बेफिकीर !

) भाजपला धक्का देत शरद पवार यांची मोठी खेळी यशस्वी !

) पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण !

        







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !