BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ जाने, २०२२

भाजपला मोठा हादरा ! शरद पवार यांची आणखी एक खेळी यशस्वी !

 



परभणी : राष्ट्रवादीचे चाणाक्ष प्रमुख शरद पवार यांनी आज मारलेल्या एक सिक्सार्मुळे भाजपला मोठा हादरा बसला असून २० वर्षांपासून भारतीय जनता पक्षात असलेले माजी आमदार विजय गव्हाणे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.  


राजकारणातील चाणाक्ष नेतृत्व शरद पवार यांच्या राजकीय खेळ्या राजकारणातील दिग्गजांच्या लक्षात येत नाहीत तिथे सर्वसामान्य नेत्यांना काही समजण्या उमजण्याचा प्रश्नच येत नाही म्हणून योग्यता नसलेले आणि काल पुढारी झालेले त्यांच्यावर तोंडसुख घेत असतात. शरद पवार मात्र अशा नेत्यांची दखल देखील घेत नाहीत. उत्तर  प्रदेशात निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे अनेक आमदार भाजप सोडून गेले आहेत आणि ही गळती वेगाने सुरु आहे. आणखी काही आमदार भाजप सोडणार असल्याचे भाकीत शरद पवार यांनी आजच केले असताना महाराष्ट्रात देखील त्यांनी भाजपचे वजनदार नेते आणि माजी आमदार विजय गव्हाणे यांना आपल्या तंबूत दाखल करून घेतले आहे.  


माजी आमदार विजय गव्हाणे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी राज्यसभा खासदार श्रीमती फौजिया खान यांनी प्रयत्न केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गेल्या काही काळापासून विजय गव्हाणे हे भाजप पासून चार हात लांबच रहात होते . पक्षाचा कार्यक्रम अथवा बैठका यापासून त्यांनी फारकत घेतली होती. भारतीय जनता पक्षात निष्ठावंतांची गळचेपी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.. माजी आमदार गव्हाणे यांची परभणी जिल्ह्याती खूप मोठी राजकीय शक्ती असल्याने भाजपला हा मोठा हादरा मानला जात आहे.  


भाजपचे माजी आमदार विजय गव्हाणे यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत  भाजपला रामराम ठोकत आपल्या हातात राष्ट्रवादीचे  घड्याळ बांधले आहे. विजय गव्हाणे यांच्या प्रवेशामुळे परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीची शक्ती खूपच मजबूत होणार आहे तर भाजपचे मोठे नुकसान होणार आहे. गव्हाणे यांच्या प्रवेशानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले आणि गव्हाणे हे मनाने आणि विचाराने तिकडे गेले होते असे कधीच जाणवले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात अनेक जण गेले आहेत आणि ते आता परतीच्या मार्गावर देखील आहेत. भाजपची पुरती साफ सफाई करून तिथले लोक आपल्याकडे येतील असे जयंत पाटील यांनी सांगितले. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !