BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ जाने, २०२२

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शेवटची सुरुवात होईल फेब्रुवारीत !




नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शेवटची सुरुवात १५ फेब्रुवारी पासून सुरु होईल आणि ओमीक्रोनने देल्ताला रिप्लेस केल्यास मार्च महिन्यापर्यंत भारतात कोरोना महामारीच्या शेवटाला सुरुवात होईल असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला असून हा एक मोठा दिलासा मानला जात आहे. 


कोरोनाची नको असलेली तिसरी लाट येऊन सगळ्यांच्या  मानगुटीवर बसली आहे आणि वाढणारे आकडे पाहून सगळ्यांचा धडकी भरली आहे. वेगाने वाढत असलेले आकडे आता मंदावलेले दिसत असताना आणि अजूनतरी दुसऱ्या लाटेसारखा विनाश केले नसताना तिसरी लाट आता लवकरच काढता पाय घेणार असल्याचे दिलासादायक संकेत प्राप्त होऊ लागले आहेत. कोरोनाची तिसरी लाट लवकरच संपणार असल्याचे अनेक अभ्यासक सांगत आहेत आणि गेल्या तीन दिवसांपासून नव्या रुग्णात सातत्याने घट होताना दिसत आहे. शिवाय मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे त्यामुळे नक्कीच दिलासा मिळू लागला आहे.


कोरोनाच्या दैनंदिन संसर्गाचे परमान २० टक्क्याच्या पुढे गेले आहे याचा अर्थ असा मानला जात आहे की, कोरोनाची चाचणी करीत असलेल्या प्रत्येक पाचव्या व्यक्तीला संसर्ग झालेला आहे. पण हे चित्र गेल्या तीन दिवसांपासून बदलताना दिसत आहे.  शासकीय सूत्रांच्या माहितीनुसार पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीच्या १५ तारखेपासून देशात कोरोनाच्या नव्या रुग्णात झपाट्याने घट पाहायला मिळणार आहे. नव्याने आढळणाऱ्या रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. याच अर्थ असा की, १५ फेब्रुवारीनंतर कोरोनाची तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. शिवाय ओमिक्रोनने जर डेल्टाला रिप्लेस केलं तर याच वर्षात म्हणजे मार्च महिन्यापासून कोरोनाच्या महामारीच्या शेवटला सुरुवात होईल असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.    


मार्च २०२२ मध्येच युरोपमधील कोरोन pendemic वरून endemic मध्ये बदलू शकतो. कुठल्याही महामारीच endemic टप्पा येतो तेंव्हा ती महामारी अत्यंत सामान्य होऊन जाते आणि निरोगी व्यक्तीला ती गंभीर स्वरुपात आजारी करूच शकत नाही आणि भविष्यात लाटेच्या स्वरुपात ती परत येत देखील नाही. कारण ही महामारी लोकात कायम राहते आणि संक्रमित देखील करते पण तिचा परिणाम तीव्र स्वरूपाचा नसतो. त्यामुळे लोकांना धोका नसतो अशावेळीच महामारीला endemic म्हणून घोषित करण्यात येत असते असे  जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोप झोनचे प्रमुख हान्स क्लुंगे यांनी सांगितले आहे. 


गेल्या महिन्यापासून अनेक तज्ञांनी कोरोना महामारीचा अंत जवळ आला असल्याचे सांगितले आहे आणि आता नवे अंदाज देखील तशाच पद्धतीने व्यक्त होऊ लागलेले आहेत. भारतीय शास्त्रज्ञ देखील अशाच प्रकारचे अंदाज व्यक्त करीत असून कोरोना हा मार्च २०२२ पर्यंत endemic अवस्थेला पोहोचेल असेच म्हटले आहे.  ओमीक्रॉन अत्यंत वेगाने पसरत आहे त्यामुळे हा व्हेरिएंट भारतात डेल्टाला रिप्लेस करील. याच अर्थ भारतात कोरोना रुग्ण हे ओमीक्रॉनची असतील आणि यामुळेच कोरोनाची अवस्था अंताकडे पोहोचलेली असेल. महामारीला धास्तावलेल्या जनतेसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी असून कोरोनापासून आता लवकरच सुटका होण्याचे संकेत अधिक गडद होताना दिसत आहेत.   


वाचा :> --म्हणून महिलेला सुनावली फाशीची शिक्षा ! 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !