BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ जाने, २०२२

रिक्षाभाड्याच्या बदल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

 



पुणे : सुसंकृत शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना पुन्हा एकदा घडली असून केवळ रिक्षा भाड्याचे पैसे नाहीत म्हणून त्या बदल्याच रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उजेडात आली आहे. 


नात्याला आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना रोजच आपल्या अवती भवती घटना दिसत आहेत. बाप मुलीवर अत्याचार करतो आहे, तिचा खून करतो आहे अशा घटनांनी नकारात्मकता वाढवायला सुरुवात केली आहे त्यातच पुण्यासारख्या शहरात अत्यंत लाजिरवाणी आणि माणुसकीला लाजेने खाली मान घालायला लावणारी घटना प्रकाशात आली आहे आणि  यामुळे अवघे पुणे हादरले आहे. 


अडीअडचणीत एकमेकांच्या मदतीला धाऊन जातात त्यालाच तर माणुसकी आणि माणूस म्हणतात पण दुसऱ्यांच्या अडचणीतही फायदा उठवणाऱ्या अमानवी प्रवृत्ती या समाजात असतात. त्यातील एका प्रवृत्तीने पुण्यात हडपसर येथील रेसकोर्स परिसरात दर्शन दिले आहे. विदेशी असलेल्या एका अल्पवयीन मुलीजवळ रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नव्हते त्यामुळे रिक्षाचालकाने तिच्यावर बलात्कार करून पैसे वसूल केल्याची ही घटना आहे. भाडे देण्यासाठी पैसे नाहीत हे पाहून रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीला रेसकोर्स जवळील झाडीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची पिडीत मुलीने पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  सागर बिभीषण बचुटे, (वय २४), विकी कुमार फुलो पासवान (वय २३), अशोक वीर बहादूर थापा (वय २३ ) या तिघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता आणि मैत्रीण सागर बचुटे याच्या बचुटे याच्या रिक्षाने बुधवार पेठेत  जात होत्या. यावेळी पिडीताकडे रिक्षा भाडे देण्यासाठी पैसे नाहीत हे पाहून त्याने तिचा गैरफायदा घेतला. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला सोडले. पुन्हा दुसऱ्यांदा रिक्षाचालक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पिडीता आणि अन्य मैत्रिणीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या रिक्षाचालक आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.    



खालील बातम्याही जरूर वाचा : त्यासाठी  लाईनवर क्लिक करा !





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !