BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ डिसें, २०२३

डोळ्यात टाकली चटणी आणि केली मोठी लूट !



शोध न्यूज : पंढरपूर - कुरूल रस्ता देखील आता मोठा धोक्याचा झाला असून भर रस्त्यावर एका वाहनाला  अडवून, त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून प्रवास करणे हे धाडसाचे ठरू लागले आहे.


पंढरपूरकडून तिऱ्हे मार्गे सोलापूरला जाणारी वाहने दिवसाही कमीच असतात, रात्रीच्या वेळेस तर या रस्त्यावर वर्दळ दिसत नाही, त्यात हा रस्ता वर्षानुवर्षे खड्ड्यात हरवलेला असतो त्यामुळे शक्यतो वाहन धारक पर्यायी मार्गाचा वापर करीत असतात.  अशा परिस्थितीचा फायदा उठवत काही चोरट्यांनी संधी साधली आणि भर रस्त्यावर लुटमार केली आहे. या रस्त्यावर अर्ध्या रात्री प्रवास केला तरी अशी घटना या आधी घडलेली नव्हती, या नंतर मात्र या मार्गावरून रात्री प्रवास करताना, चोरांची दहशत मनात राहणार आहे.  औषधांची विक्री करून कामती गावाकडे येत असलेल्या वाहनाला अडवून आणि दहशत माजवून लुटण्यात आले आहे, पंढरपूर रस्त्यावर कुरूल गावाच्या हद्दीत हा थरारक प्रकार घडला. वाहन अडवून काचेवर दगड मारून अंगावर व डोळ्यात मिरची पूड टाकून जबरदस्तीने ड्रायव्हर जवळील औषध विकी करून आलेली १ लाख ५ हजार रुपये व दहा हजार रुपयांचा मोबाइलया  रिक्षातून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी ही लुटमार केली आहे. 


कामती येथील सैफन सिकंदर सय्यद हे कुरुल, सय्यद वरवडे, मोहोळ, पेनूर, पाटकुल, सिकंदर टाकळी, पुळूज, अंकोली या गावातून परत येत होते. औषध दुकानांना औषधे पुरवून ते चार चाकी वाहनातून परत कामती येथे निघाले होते. कामती गावाच्या हद्दीत आल्यानंतर, महावितरण उप केंद्राजवळ ते आले तेंव्हा रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास हा थरार झाला.    गाडीच्या समोर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर जात होता, तर त्याच्या पाठीमागे एक रिक्षा जात होती. अचानक रिक्षा थांबून त्यातून तीन अनोळखी व्यक्ती खाली  उतरल्या. त्यातील दोघांनी सदर वाहनाच्या काचेवर दगड मारला. दोघांनी मिळून ड्रायव्हरच्या अंगावर आणि  डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांचाकडील बॅग हिसकावून घेण्यात आली. या बॅगेत एक लाख पाच हजार रुपये रोख आणि दहा हजार रुपये किमतीचा एक मोबाईल होता. हा ऐवज घेवून अज्ञात चोरटे पसार झाले. या प्रकरणी कामती पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 


सदर मार्गावर पहिल्यांदाच अशी घटना घडली असल्याने पोलीस देखील आचंबित झाले आहेत. पोलिसांनी आपला तपास सुरु केला असला तरी, परिसरात मात्र चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. (Theft by intercepting a vehicle on Pandharpur - Kurul road) या आधी अशा घटना घडल्या नसल्यामुळे, रात्री अपरात्री अनेकजण चार चाकी आणि दोन चाकी वाहनाने देखील प्रवास करीत असतात. या घटनेमुळे मात्र अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. 


१४ चोरटे गजाआड !

पंढरपूर शहरात देखील नेहमीच चोऱ्या होत असतात पण यावेळी पोलिसांनी परप्रांतीय १४ चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम केले आहे. अध्यात्मिक कार्यक्रमांसह मार्गशीर्ष महिन्यामुळे पंढरपुरात लाखो शिवभक्त भाविकांची गर्दी झाली आहे. या गर्दीचा   गैरफायदा घेण्यासाठी आसपासच्या व अनेक परप्रांतीय चोरट्यांच्या टोळ्याही दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. येथे सोमवारी श्री शिव महापुराण कथा सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी, चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. दरम्यान, पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेने १३ महिलांसह १४ चोरट्यांना पकडून गजाआड केले. श्री शिव महापुराण कथेचे आयोजन केले असल्यामुळे महिलांची गर्दी झालेली आहे त्यामुळे, महिला चोर पंढरीत दाखल झाले आहेत.   




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !