BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ जाने, २०२२

'ओमीक्रॉन' ने घेतला आणखी एक बळी !

 



मुंबई : 'ओमीक्रॉन' ने राज्यात एक बळी घेतल्यानंतर आता याच व्हेरिएंटने ओरिसातील एका महिलाच बळी घेतला असल्याची घटना समोर आली आहे. 


दुसऱ्या लाटेत कोरोनाने अगणित जीव घेतल्यानंतर आक्रमण केलेल्या 'ओमीक्रॉन' या व्हेरिएंटने महाराष्ट्र राज्यातील पहिला बळी पिंपरी येथे घेतला आहे. एका ५३ वर्षे वयाच्या व्यक्तीचा मृत्यू 'ओमीक्रॉन' मुळे झाल्याचे स्पष्ट झाले आणि राज्यातील हा 'ओमीक्रॉन'चा पहिला बळी ठरला. नायजेरिया येथून ही व्यक्ती पिंपरी चिंचवड येथे परतली असताना हृदय विकाराने मृत्यू आला पण तपासणीत हा मृत्यू 'ओमीक्रॉन' चा असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.  जगातील पहिला 'ओमीक्रॉन' बळी ब्रिटनमध्ये झाला आहे त्यानंतर 'ओमीक्रॉन' आपले हातपाय जगभरात पसरवत असल्याचे समोर आले. कोरोनाने दुसऱ्या लाटेत देश विदेशातील लाखो बळी घेतले आहेत आणि अजूनही कोरोना उग्र अवस्थेत असताना 'ओमीक्रॉन' ने देखील झोप उडवली आहे. 


'ओमीक्रॉन' चा राज्यातील पहिला बळी पिंपरी चिंचवड येथे घेतल्यानंतर आणखी एक बळी ओरिसा राज्यात घेतला आहे. ओरिसातील बोलांगीर येथे एका ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू 'ओमीक्रॉन' मुळे झाला आहे. त्यापूर्वी राजस्थानमधील उदयपूर येथे एका ७३ वर्षे वयाच्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.  ओरिसात मृत्यू झालेली महिला ब्रेन स्ट्रोक झाल्याने मृत्युमुखी पडली होती परंतु त्यानंतर करण्यात आलेल्या चाचण्यांतून हा मृत्यू 'ओमीक्रॉन' चा असल्याचे दिसून आले आहे. ओरिसातील अलगपूर गावात राहणारी ही महिला गेल्या महिन्यापासून ब्रेन स्ट्रोक ने त्रस्त होती आणि या महिलेचा कुठलाही विदेशी प्रवास  झालेला नव्हता. सदर महिलेच्या करण्यात आलेल्या चाचणीत प्रारंभी ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आलेली होती. त्यानंतर 'ओमीक्रॉन' च्या तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले असता सदर महिला 'ओमीक्रॉन' पॉझिटिव्ह निघाली अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 


वाचा : > देवेंद्र फडणवीस यांना उच्च न्यायालयाची नोटीस ! 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !