BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ जाने, २०२२

अपघात : उभ्या ट्रकवर धडकली दुसरी ट्रक, दोन ठार !

 


भीषणच !



मोहोळ : उभ्या असलेल्या ट्रकला दुसऱ्या ट्रकने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले असून ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

 

पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रुंद करून सिमेंटचा झाल्यापासून अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. मोहोळ ते सोलापूर या दरम्यान तर सतत अपघात होता असताना आज पुन्हा मोहोळजवळच यावली शिवारात अत्यंत भीषण अपघात झाला आणि या अपघातात दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. रस्त्यांच्या बाजूला एक मालट्रक (आर जे/ जी ए ५५०५ ) रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याच्या दिशेने निघालेला हा ट्रक उभा करताना कसलीही काळजी घेतलेली नव्हती. पार्किंग लाईट चालू न ठेवताच हा ट्रक रस्त्याकडेला थांबविण्यात आला होता. पुण्याकडे निघालेला दुसरा ट्रक  (एम एच १२ /एस एक्स ४१७४) पाठीमागून आला आणि सरळ उभ्या ट्रकला धडकला. पार्किंग लाईट न लावल्याने आणि पडलेल्या धुक्यामुळे उभा असलेला त्रूक मागून येणाऱ्या ट्रक चालकाला दिसला नाही त्यामुळे त्याने सरळ पुढच्या उभ्या ट्रकला धडक दिली. पाठीमागून आलेल्या ट्रक मधील दोघांचा यात जागीच मृत्यू झाला. रोहित गुलबाके आणि मनोज गुलबाके अशी मृत व्यक्तींची नावे असून ते दोघेही मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील चांदोरा खुर्द येथील रहिवाशी आहेत.  


अपघाताचे वृत्त समजताच मोहोळ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन क्रेन मागवून अपघात झालेली दोन्ही वाहने बाजूला केली. ही वाहने बाजूला काढण्यात आल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला. अपघात झालेल्या ट्रकमध्ये दोन्ही मृतदेह अडकून पडले होते, हे मृतदेह क्रेनच्या मदतीने बाजूला काढण्यात आले. पाठीमागून धडकलेल्या ट्रकचे मोठे नुकसान झाले असून समोरची बाजू पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. अपघाताची खबर अमर डोंबे यांनी मोहोळ पोलिसात दिली असून पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात येथील टोळ नाका व्यवस्थापनाच्या चुकीमुळे झाल्याची चर्चा घटनास्थळी करण्यात येत होती. 


वाचा : सोलापूर जिल्ह्यात गोळीबार, सरपंचावर झाडली गोळी !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !