BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ जाने, २०२२

बापानेच विष देऊन कापले बायको मुलांचे गळे !

 



लातूर : शेतकरी बापाने आपल्याच पत्नीला आणि दोन चिमुकल्या मुलांना विष पाजून त्यांचे गळे ब्लेडने कापल्याची थरकाप उडविणारी घटना समोर आली आहे. उभ्या महाराष्ट्राचा थरकाप उडविणारी ही घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. 

 

अलीकडे रोज एकेक नव्या घटना घडत असून त्या धक्कादायक आणि चिंताजनक अशाच असल्याचे समोर येताना दिसत आहे. घरातील माणूस सुरक्षित नसून घरातच वैरी जन्माला येत आहेत असेच प्रकार गेल्या काही दिवसात वाढीस लागलेले दिसत आहेत. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे तर थरकाप उडविणारी आणि काळीज गोठविणारी घटना घडली आहे. एका शेतकऱ्याने आपल्या पत्नीला विष पाजले, स्वतःही विषाचे प्राशन केले आणि दोन चिमुकल्या मुलांनाही विष पाजले आणि त्यांचे गळे चिरले. अत्यंत भयावह आणि भयानक प्रकार समोर आल्याने प्रत्येकालाच धक्का बसला आहे. मुलांचे गळे चिरताना जन्मदात्या बापाचे हात कसे थरथरले नसतील हाच खरा सवाल आहे. 


लातूर येथील रहिवासी असलेला शेतकरी आतिष बाबुराव नरके याने डोक्यात काही प्लॅन केला आणि पत्नीला फिरायला जाऊ असे सांगितले. पत्नी विशाखा १४ वर्षे वयाचा पारस आणि १२ वर्षे वयाच्या लोकेश या चिमुकल्याना सोबत घेऊन दुचाकीवरून आंबेजोगाई येथे घेऊन गेला. बापाने आपल्याला फिरायला नेल्याने मुलेही खुश होती आई पत्नीलाही आनंद झाला होता. येथे लॉज मिळाले नाही त्यामुळे आतिष नरके याने पत्नी आई मुलांना एका हॉटेलमध्ये जेवायला घातले आणि पुन्हा त्यांचा प्रवास लातूरच्या दिशेने सुरु झाला. लातूरला जाता जाता वाटेत असणाऱ्या शेरा गावाकडे त्याने आपली गाडी वळवली. पत्नी आणि मुलांना काहीच समजेना. लातूरला निघालेले असताना गाडी दुसऱ्याच रस्त्याला कशासाठी वळविण्यात आली याचा कुणालाच अंदाज आला नाही. 


आतिष नरके याने आपली दुचाकी एका शेतातील उसाच्या फडाजवळ उभी केली. नरके हा इकडे यातना पूर्ण कारस्थान करूनच आलेला होता. दुचाकी थांबवून त्याने टॉनिक असल्याचं सांगून चक्क विष प्यायला दिलं. पत्नी विशाखा, पारस आणि लोकेश हे दोन लहान मुलं ते विष प्यायले. काही वेळेतच या तिघांचीही शुद्ध हरपली. त्यानंतर आतिष नरके याने तिघांच्याही गळ्यावर ब्लेड फिरवले आणि त्यांचे गळे कापले. एवढ्यावर तो थांबला नाही की तेथून पळूनही गेला नाही. तो स्वतः देखील हे विष प्याला आणि आपल्याच हाताने आपल्या गळ्यावर वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  


दरम्यान काही वेळेनंतर थोरला मुलगा पारस याला थोडीफार शुद्ध आली. एकूण प्रकाराने तो घाबरून गेला आणि काय करावे हे त्याला सुचेनासे झाले. आजूबाजूला मदतीलाही कोणी दिसत नव्हते. त्याने आपल्या वडिलांचा मोबाईल घेतला आणि आपल्या मामाला त्यावरून फोन केला.  त्याचे मामा आंबेजोगाई तालुक्यातील सुगाव या गावी राहतात, त्यांना एकंदर घटनेची माहिती पारस याने दिली. भाचा जे सांगत होता त्याने मामा पुरता हादरून गेला होता आणि त्याचा विश्वासही बसत नव्हता. मामाने क्षणाचाही विलंब न करता काही नातेवाईकांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली.  चौघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्यांनी पहिले पारस काहीसा शुद्धीवर होताच पण बाकीचे तिघे बेशुद्ध होऊन पडलेले त्यांना दिसले. मामा श्रीकांत पवार यांनी स्थानिक लोकांची मदत घेत चौघांनाही लातूर इथल्या एमआयटी रुग्णालयात दाखल केले. 


रुग्णालयात मुलगा पारस आणि त्याचा शेतकरी वडील आतिष नरके हे शुद्धीवर आले पण लोकेश आणि त्याची आई यांची प्रकृती मात्र अत्यावस्थच आहे. कर्ज खूप झाल्यामुळे आपण हा निर्णय घेतला असल्याचे आतिष नरके यांनी शुद्धीवर आल्यावर सांगितले. शेतकरी आतिष नरके यांच्याविरोधात रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मात्र महाराष्ट्र हादरला आहे.


वाचा : रिक्षाच्या भाड्याला पैसे नव्हते म्हणून रिक्षा चालकाने केला बलात्कार !          


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !