BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ जाने, २०२२

रामदेवबाबा गोत्यात ! होणार आता पोलीस चौकशी !

 




पुणे : जगाला योग शिकवत आरोग्य देणारे रामदेव बाबा आता मात्र चांगलेच गोत्यात आले असून त्यांची पोलीस चौकशी करण्याचे आदेश थेट नायालायानेच दिले आहेत. 


बाबा रामदेव आणि त्यांचे पतंजली संस्थान जगात सुपरिचित आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजलीमधून उत्पादित होणारी औषधी जगभर वापरात आणली जाते आणि बाबा रामदेव यांनी केलेल्या दाव्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला जातो. योगातील त्यांचे कार्य महान आहे आणि त्यांनी नक्कीच जगाला आरोग्य देण्याचे महान कार्य केले आहे. परंतु अलीकडे अधून मधून त्यांच्या पतंजली उत्पादनाबाबत उलट सुलट प्रतिक्रिया येणे सुरु झाले आहे. ग्राहक डोळे झाकून त्यांनी केलेल्या दाव्यावर विश्वास ठेवतो आणि त्यांचे उत्पादन खरेदीही करतो. त्यांच्या कोरोनील या औषधीबाबत मात्र आधीही चर्चा, वाद झाले आहेत आणि आता तर न्यायालयानेच बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांची पोलीस चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 


'पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होतो' असा दावा योग गुरु रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी केला होता. त्यावर जनतेला दिलासाही मिळाला होता आणि अनेकांनी टीका देखील केली होती. पण त्यांच्या या दाव्यावर मदन कुऱ्हे यांनी ऍड. असीम सरोदे यांच्यामार्फत  पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खाजगी फौजदारी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने बाबा रामदेव आणि  आचार्य बाळकृष्ण यांची पोलीस चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 'कोरोनील' हे कोरोना बरा करणारे औषध शोधून काढल्याचा खोटा आणि वेकायदशीर दावा रामदेव बाबा यांनी २४ जून २०२० रोजी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आणि संपूर्ण देशाची दिशाभूल केली असा आरोप या तक्रारीतून करण्यात आला आहे.    


जुन्नर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पी व्ही सपकाळ यांनी याबाबत जुन्नर पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी तपास करून ७ फेब्रुवारी २०२२ किंवा तत्पूर्वी अहवाल सादर करावा असे आदेशात म्हटले आहे त्यामुळे पुन्हा एकदा बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात असे खोटे दावे करून भीतीच्या सावटाखाली असलेल्या भारतीय जनतेकडून केवळ पैसे कमविण्याच्या व्यापारी उद्देशाने हे सर्व करण्यात आले आहे असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. कोरोनाच्या कालावधीत केलेल्या अशा दाव्याबाबत बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्यावर हा खटला दाखल असून महाराष्ट्रात या काळातील हा एकमेव खटला आहे.  या तक्रारींवर न्यायालयाने पॉलिसी चौकशीचे आदेश दिल्याने पतंजली ची उत्पादने आणि बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण गोत्यात आल्याचे सद्यातरी दिसत आहेत.  पतंजलीची उत्पादने खरेदी करणाऱ्या ग्राहकाच्या मनात यामुळे शंका आणि  संशय उत्पन्न होण्याची शक्यता आहे.


खालील बातम्याही जरूर वाचा : 

त्यासाठी खालील लाईनवर क्लिक करा !




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !