इंदापूर, ( आदेश नागपुरे ) : कडाक्याच्या थंडीत मध्यरात्रीच्या वेळेस निर्दयी मातेने नवजात बालकाला रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची अत्यंत धक्कादायक आणि तितकीच हृदयद्रावक घटना आज उघडकीस आली आहे.
'मुलं ही देवाघरची फुलं' असं म्हटलं जातं आणि गोंडस मुल दिसलं की कुणालाही त्याला जवळ घेण्याचा मोह होतो. आई तर त्याला काळजात जपत असते. आईच्या ममतेचे वर्णन करण्यासाठी शब्दांचा खजिनाही अपुरा पडत असतो एवढी आईच्या ममतेची महानता आहे. पण काही महिला या मातृत्वालाच कलंकित करतात. आईच्या महानतेला काळिमा फासतात अशा काही घटना अधूनमधून समाजात घडत असल्याचे पाहायला मिळते. पुणे- सोलापूर मार्गावर देखील अशीच एक अत्यंत हृदयद्रावक आणि काळजाचा थरकाप उडविणारी घटना आज उघडकीस आली आहे.
पुणे - सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव येथे आज मानवता आणि मातृत्वाला कलंकित करणारी ही धक्कादायक घटना समोर आली. राज्यात थंडीचा कडक वाढला आहे. रक्त गोठावे अशी थंडी पडलेली अनुभवाला येत आहे आणि अशा कडाक्याच्या थंडीत अर्ध्या रात्री मातुत्वाला कलंकीत करणाऱ्या निर्दयी मातेने एका नावात बालकाला रस्त्याकडेला फेकून दिलेले आढळून आले आहे. एक ते दीड महिन्याच्या या नवजात बालकाला कपड्यात गुंडाळून रस्त्याकडेला फेकून देऊन माता बेपत्ता झाली असल्याचे उघडकीस आले. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका चहाच्या टपरीच्या आडोशाला या बाळाला टाकून माता नावाची निर्दयी स्त्री निघून गेली होती.
सकाळच्या वेळेस एका कामगाराच्या निदर्शनास हा प्रकार आला आणि त्याला धक्काच बसला. मातेच्या मामातेवरील विश्वास उडविणारी ही घटना पाहून कामगार गोंधळला. घरात उबदार कपडे अंगावर घेवूनही या थंडीचा सामना करणे सद्या अवघड असताना हे महिन्या दीड महिन्याचे बालक रात्रभर उघड्या आभाळाच्या खाली पडलेले होते. कामगाराने हा प्रकार पाहिल्यानंतर त्याने जवळच असलेल्या पेट्रोल पंपाचे भारत शिंदे यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना माहिती दिली. शिंदे यांनी तातडीने तिकडे धाव घेतली आणि इंदापूर पोलिसांना या अमानुष घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी हे बाळ पोलिसांच्या स्वाधीन केले. एकूण प्रकार पाहून पोलिसांचे देखील हृदय पाझरले होते पण आईच्या ममतेला मात्र पाझर फुटलेला नव्हता.
खालील बातम्या वाचल्यात काय ?
नसल्यास त्यावर क्लिक करा >>
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !