शोध न्यूज : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील वातावरण ढवळून निघाले असतांना, आणि मराठा तरुण टोकाचे पाउल उचलत असताना, आणखी एका मराठा युवकाने शिव स्मारकाच्या समोरच आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची दु:खद घटना घडली आहे.
मराठा आंदोलनाचा विषय राज्यात धगधगत आहे, मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil) यांनी तर आपला जीव डावावर लावला आहे आणि संपूर्ण राज्यातून त्यांच्या आंदोलनाला प्रचंड पाठींबा मिळत आहे. राज्यभर सभा घेत त्यांनी धडाका लावला असून, गावागावातून त्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनाने मंत्रालय हादरून गेले असून, विधानसभेतही हा आवाज घुमू लागला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी समोर आल्या असून, या मराठा बांधवाना आरक्षण मिळू लागले आहे. एकीकडे हे आशादायी चित्र दिसत असतानाच, दुसरीकडे मार्थ तरुणाचे नैराश्य वाढलेलेच दिसत आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या मागणीसाठी मराठा आग्रही आहे पण या नैराश्यातून मराठा तरुण आत्महत्या करून आपल्या आयुष्याचा शेवट करून घेताना दिसत आहेत. आजवर अनेक तरुणांनी अशा प्रकारचे टोकाचे पाउल उचलले असून आता पुन्हा एका मराठा तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या समोर विष प्रश्न करून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथे ही दु:खद घटना घडली आहे. ३९ वर्षे वयाच्या विजय पुंडलिक राकडे या मराठा तरुणाने, शिव स्मारकाच्या समोरच विष प्रश्न करून स्वत:ला संपवले. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात हा तरुण सक्रीय होता आणि मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे तो चिंतेतही होता, अखेर त्याने खामगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या समोर विष घेतले. त्याने विष प्राशन केल्याचे लक्षात आल्यावर गावकरी आणि नातेवाईक यांनी, फुलंब्री येथील रुग्णालयात दाखल केले. विष प्राशन करून काही काळ झाला असल्याने त्याची प्रकृती अधिकच बिघडली होती. फुलंब्री येथील रुग्णालयातून त्याला छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु या धावपळीचा काहीच उपयोग झाला नाही.
मराठा आंदोलनात सक्रीय असलेल्या या मराठा तरुणाने विष घेतल्याची माहिती मिळाली तेंव्हा गावात आणि परिसरात देखील मोठी खळबळ उडाली. (Another sacrifice for Maratha reservation) नातेवाईक गोंधळून गेले आणि त्याला वाचविण्यासाठी नेटाने प्रयत्न केले पण अखेर या तरुणाचा मृत्यू झाला आणि अवघा परिसर व्यथित झाला. विष प्राशन करण्यापूर्वी त्याने एक चिट्ठीही लिहून ठेवली आहे. "माझ्या मुलींना, मुलांना शिकवण्यासाठी मीपूर्णपणे कटिबद्ध असतानाही माझ्या मुलांना आरक्षण नसल्याने भविष्यात त्यांच्यासाठी मी काही करू शकत नाही. येणाऱ्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळावे, यासाठी मी आत्महत्या करीत आहे", असे त्याने या चिट्ठीत म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !