BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० जाने, २०२२

सावकाराच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या !

 



( आदेश नागपुरे )

इंदापूर : अलीकडे इंदापूर तालुक्यात सावकारी बोकाळत असल्याचे समोर येत असून सावकाराच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने गळफास लावून आपले जीवन संपवले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


इंदापूर येथे नेताजी नगर, चाळीस फुटी रोड येथे राहणाऱ्या ३० वर्षे वयाच्या विशाल दत्तात्रय गवळी याने राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. विशाल याचे चुलते उत्तम गवळी यांनी याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून इंदापूर तालुक्यात या घटनेने खळबळ उडवून दिली आहे. सुरुवातीला आत्महत्येचे कारण समजू शकले नव्हते परंतु विशालने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली एक चिट्ठी सापडली असून यातून ही आत्महत्या सावकारी जाचातून झाली असल्याचे उघड झाले आहे. 


विशाल याने आपल्या घरातील एका भीतीला लावलेल्या खिळ्याला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास येताच त्याच्या गळ्यातील फास सोडवून त्याला तातडीने उपचारासाठी इंदापूर येथील उप जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते पण उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. सावकाराच्या त्रासाला कंटाळून त्याने ही आत्महत्या केली असल्याची बाब त्याने लिहून ठेवलेल्या चिट्ठीतून समोर आली आहे.  विशालने एका खाजगी सावकाराकडून ५० हजार रुपयांची रक्कम व्याजाने घेतली होती आई सदर रक्कम नंतर सावकारास परत केली . ही र्काक्कम परत देत असताना सावकाराने चेक घेतला आणि नोटरी करून घेतली आणि आमच्यावर केस केली. त्याने खूप त्रास दिल्याने आत्महत्या करीत आहे अशा आशयाची चिट्ठी विशाल गवळी याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवली असून ती पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्यानुसार इंदापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत. 


वाचा : सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु होणार !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !