BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० जाने, २०२२

पंढरपूर कारागृहात कोरोनाचा शिराकाव !

 


पंढरपूर : पंढरीत कोरोनाची रुग्णसंख्या अधिक वाढत असताना आता पंढरपूर कारागृहात देखील कोरोनाने शिरकाव केला असून कोठडीतील १७ कैद्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे.


सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण बार्शी आणि पंढरपूर तालुक्यात आढळून येत आहेत त्यामुळे आधीच  चिंता व्यक्त होता असताना पंढरपूर कारागृहात देखील कोरोना पोहोचला आहे. त्यामुळे आता अधिक चिंता निर्माण  झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच मंगळवेढा उप कारागृहातील आठ कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले होते त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच कारागृहात हा धोका असण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच पंढरपूर कारागृहापर्यंत कोरोना पोहोचला असून १७ कैद्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. 


कारागृहातील कैद्यांना कोरोना झाल्याची बाब म्हणजे पोलिसांना देखील हा धोका स्पष्ट असतो. कैद्यांना तर कोरोनाची बाधा झाली आहेच पण तीन पोलीस देखील कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. कारागृह आणि पोलीस यांचा नित्याचा संपर्क असतो त्यामुळे हा संसर्ग वेगाने होण्याची शक्यता उघड असते. कारागृहासाठी स्वत्रंत्र पोलिसांची नेमणूक असते आणि कैद्यांना पाणी देण्यापासून त्यांना रुग्णालयात तसेच न्यायालयात नेण्यापर्यंत अनेक कामे या पोलिसांनाच करावी लागतात. नियमित संपर्कामुळे हा संसर्ग होणे अधिक सहज असते. त्यानुसार पोलीसानाही कोरोना झाल्याचे समोर आले आहे. 


कारागृहातील कैदी, पोलीस यांच्यासोबत उप जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी देखील कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी, सुरक्षा रक्षक अशा २१ जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर ६५ एकरातील कोविड सेंटर येथे उपचार करण्यात येत आहेत.  पंढरपूर शहरातील नागरिकांनी आता तरी कोरोनाला गंभीरपणे घेण्याची गरज असून कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याची आवश्यकता आहे. हळूहळू करीत कोरोना पंढरपूरमधील सर्वच क्षेत्रे व्यापू लागला असून नागरिकांनी स्वयंशिस्त नाही पाळली तर पुढील काही दिवसांत पंढरपूरची स्थिती भयावह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !