मुंबई : हिवाळ्याचा कडाका, कोरोनाचे वादळ आणि त्यात आता अकाली पावसाचे संकट येऊ घातले असून आता महाराष्ट्रात पाऊस आणि गारपीठ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला असून अडचणीतला शेतकरी पुन्हा अधिक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हवामानाचे आणि ऋतुचे चक्र लहरीप्रमाणे फिरू लागल्याने शेतकरी अडचणीत येतच आहे. हिवाळ्यात पाऊस,उन्हाळ्यात गारपीठ, पावसाळ्यात उन्हाळा असं सगळच विचित्र सुरु आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी सतत अडचणीत येत असून हाताशी आलेले पिक अखेरच्या क्षणी बरबाद होते त्यामुळे शेतकरी पुरता कोलमडून जात आहे पण निसर्गाच्या पुढे कुणीच काही करू शकत नाही. आता ऐन थंडीच्या कडाक्यात पाउस आणि गारपीठ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे.
मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. २२ जानेवारी, २३ जानेवारी रोजी दोन दिवस पाऊस पडेल आणि २१, २२ रोजी गारपीठ होईल अशी ही शक्यता आहे. सद्या थंडीचे दिवस असून उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम आहे. त्यातच विदर्भ, मराठवाडा येथे गारपीठ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या प्रारंभी राज्यात काही ठिकाणी पाऊस पडला, गारपीटही झाली त्यामुळे शेतकरी नुकसानीत आलेला आहे. द्राक्ष, कांदा पिकांचे देखील मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्यातच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील काही दिवसात पाऊस पाडण्याबाबत हवामान विभागाने इशारा दिला आहे. महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून दक्षिण कोकण, गोवा ते दक्षिण मध्य महाराष्ट्र असा हा पट्टा सक्रिय झाला असून त्यामुळे राज्यात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !