पंढरपूर : एका महिलेच्या घरात घुसून तिला ओढत एका 'समाजसेवका' ने विनयभंग केल्याचा गुन्हा पंढरपूर तालुक्यात घडला असून करकंब पोलीस ठाण्यात त्याची नोंद करण्यात आली आहे.
पंढरपूर तालुक्यात कधी काय घडेल आणि कोण घडवेल हे काही सांगता येत नाही अशीच परिस्थिती अलीकडे आल्याचे दिसत आहे. सासरा सुनेच्या स्नानाचे चित्रीकरण करून तिला ब्लॅकमेल केल्याची घटना अलीकडेच घडली तर त्यानंतर लगेच आणखीही एक घटना घडली होती आणि आता एका सामाजिक कार्यकर्त्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने करकंब पोलीस ठाण्यात या 'सामाजिक' कार्यकर्त्या विरुद्ध फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सदर फिर्यादीनुसार आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी हा पीडित महिलेच्या घरात घुसला. यावेळी सदर महिलेच्या दोन मुली देखील तेथे उपस्थित होत्या. तो घरात घुसला आणि 'तुझा पती कुठे आहे सांग' असे म्हणत थेट तिला तिच्याच घराच्या आत ओढू लागला. या प्रकाराने गोंधळलेली पीडित महिलेने आरडाओरडा केला, पीडितेच्या मुलींनीही आरडाओरडा केला. या गोंधळामुळे कुणीतरी येईल या भीतीने त्याने तेथून काढता पाय घेतला. हा संपूर्ण प्रकार अकस्मात घडून गेला होता त्यामुळे महिला आणि तिच्या मुली घाबरून गेल्या होत्या.
विनयभंग केल्याचा आरोप झालेला हा बाबुराव सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेत असून त्याने यापूर्वी एका सामाजिक संघटनेत काम केले असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने उंबऱ्यात खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर महिलेने आपल्या पतीला फोन करून घडल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर या पीडित महिलेने करकंब पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीच्या विरोधात तक्रार केली. सदर तक्रारीनुसार पोलिसांनी संशयित आरोपीच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !