मोबाईल चोरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या मंदार याने याबाबत पोलिसांना माहिती दिली लाहे. यावेळी नेमके काय घडले हे त्याने सविस्तर सांगितले आहे. (Sushilkumar Shinde's mobile theft attempt, the facts are different) त्यानुसार या प्रवासावेळी मंदार गुरव याने सुशीलकुमार शिंदे यांना "साहेब, प्लीज दोन मिनिटे" असे म्हणत थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिंदे यांनी "बाथरूमला जाऊन येतो, तू थांब" असे म्हटले त्यामुळे मंदार थांबला आणि शिंदे यांच्या सीटवर बसण्यासाठी तेथील मोबाईल बाजूला ठेवण्यासाठी उचलला आणि तेवढ्यात आमदार प्रणिती शिंदे यांनी पाहिले. त्या एकदम "चोर चोर" म्हणून ओरडल्या. अशी हकीगत मंदार याने पोलिसांना सांगितली आहे. गैरसमजातून हा प्रकार घडला आहे पण यामुळे संपूर्ण कुटुंब तणावात असल्याचे मंदारचे कुटुंबीय सांगत आहेत.
शोध न्यूज : केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल चोरल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या माढा तालुक्यातील तरुणाने आपली बाजू स्पष्ट केली असून चोरी करण्याचा विषयच नसल्याचे त्याने म्हटले आहे.
माढा तालुक्यातील एका तरुणाला मोबाईल चोरीच्या प्रकरणात अटक झाली आहे. मोबाईलचोर अनेक असले तरी त्यांच्यापेक्षा ही घटना वेगळी आहे कारण राज्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचाच मोबाईल चोरल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या आमदार कन्या प्रणिती शिंदे हे सिद्धेश्वर एक्सप्रेसने मुंबईला निघालेले असतात प्रवासात ही घटना घडली. त्यांचा मोबाईल चोरीला गेल्याचा केवळ आरोप नव्हे तर स्वत: सुशीलकुमार शिंदे यांची एका तरुणाला मोबाईल घेवून जात असताना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांच्या चौकशीत मंदारने दिलेल्या माहितीमुळे हा प्रकार वेगळाच असल्याचे समोर आले आहे.
सदर तरुण हा माढा तालुक्यातील घाटणे येथील असून त्याचे नाव मंदार प्रमोद गुरव असे आहे. २३ वर्षे वयाचा हा तरुण ग्रामपंचायत सदस्यांचा मुलगा असल्याचीही माहिती पुढे आली. सुशीलकुमार शिंदे हे दादर स्टेशन जवळ आल्यावर बाथरूममध्ये गेले होते. जाताना त्यांनी आपला मोबाईल रेल्वेतील सीटवर ठेवला होता. ते जेंव्हा बाथरूममधून बाहेर आले तेंव्हा प्रमोद गुरव हा त्यांचा मोबाईल घेवून जात असल्याचे त्यांना दिसले. शिंदे यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी या तरुणाला पकडून ठेवले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानुसार रेल्वे पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून प्रमोद गुरव याला अटक देखील करण्यात आली.
लोहमार्ग पोलिसांनी प्रमोद गुरव याच्याकडे चौकशी केली असता त्याने मात्र कानावर हात ठेवत 'तो मी नव्हेच" अशी भूमिका घेतली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्र्यांचा मोबाईल चोरी करण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस देखील या घटनेकडे विशेष लक्ष देत असून चोरीच्या या घटनेने खळबळ उडवून दिली आहे. प्रमोद गुरव याने मात्र 'आपण मोबाईल चोरी करीत नव्हतो तर तो उचलून बाजूला ठेवत होतो' असा बचाव केला असल्याचे पोलीस सांगत आहेत. प्रमोद गुरव याचे कुर्डूवाडी येथे एक दुकान असल्याचीही माहिती पुढे येत आहे परंतु त्याने कुठल्या कारणासाठी सुशीलकुमार शिंदे यांचा पाठलाग केला ? त्यांचा मोबाईल नक्की कुठल्या कारणासाठी चोरण्याचा प्रयत्न केला ? अशा काही प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधू लागले आहेत. मंदार याने दिलेल्या माहितीवरून त्याचा 'बकरा' होतोय की काय ? अशीही परिस्थिती दिसू लागली आहे.
संशयित आरोपी प्रमोद गुरव हा मोबाईल चोरी करीत नव्हतो असे सांगत असला तरी पोलीस यावर विश्वास ठेवणार नाहीत. मुळात सुशीलकुमार शिंदे यांच्या आरक्षित कुपीत जाण्याचे आणि तेथे जाऊन त्यांचा मोबाईल हाताळण्याचे काहीच कारण नसताना त्याने मोबाईल उचलला आहे. मंदार हा जैन इरिगेशनचा डीलर असून कुर्डूवाडी येथून तो सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये बसला होता. त्याचेही आरक्षण सुशीलकुमार शिंदे असलेल्या डब्यातच होते. शिंदे यांना पाहिल्यावर त्यांच्याशी काही संवाद साधण्याची मंदारची इच्छा झाली असावी आणि त्यानंतर हा प्रकार पुढे घडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !