BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ जाने, २०२२

सोलापूर 'सिव्हील' च्या ४१ डॉक्टरना कोरोना, ५ नर्स बाधित !

 



सोलापूर : कोरोना वाढत असताना कामाला येत असलेली आरोग्य यंत्रणाच बाधित होताना दिसत असून सोलापूर येथील सिव्हील हॉस्पिटलमधील ४१ डॉक्टर आणि ५ नर्स कोरोनाबाधित झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग यांनी अपरिमित परिश्रम घेतले आहेत. जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी त्यांच्या आरोग्य धोक्यात घालून त्यांनी काम केले आहे आणि आजही करीत आहेत. आरोग्य विभागातील आणि पोलीस दलातील अनेकजणांचा बळी कोरोनाने घेतला आहे तरीही हिमतीने हे दोन विभाग लढत आहेत. आता पुन्हा कोरोनाने जोर पकडला असून रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा वेळीच सोलापूर येथील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हील हॉस्पिटल येथील ४६ जण कोरोना बाधित झाले असून यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्यासह ४१ डॉक्टर आणि ६ नर्स यांचा समावेश आहे. या सर्वांची प्रकृती ठीक असून त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.  


जिल्हा सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स बाधित झाल्याचे समोर आले असतानाच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील प्रशासकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी, दोन कनिष्ठ सहायक हे देखील कोरोना बाधित झाले आहेत. प्राथमिक शिक्षण विभागातील तीन कर्मचारी देखील कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयाच्याच ठिकाणी आरोग्य विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग आणि प्राथमिक शिक्षण विभागाची कार्यालये आहेत. ही सर्व कार्यालये एकाच इमारतीत असल्यामुळे संसर्ग अधिक होण्याचा धोका आहे. या परिसरात सतत वर्दळ असते आणि परस्परांचा संपर्क अधिक होत असतो. आणखी प्रसार होऊ नये म्हणून तातडीने खबरदारी घेण्याची गरज येथे निर्माण झाली आहे.  


हे वाचलत का? > पंढरपूर पोलिसांनी पकडले आठशे बेफिकीर !

) भाजपला धक्का देत शरद पवार यांची मोठी खेळी यशस्वी !

३ पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण !

) तंगाट गडी घुसला थेट साहेबांच्याच ऑफिसमध्ये !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !