BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ जाने, २०२२

पंढरीत पोलिसांना दोन दिवसात सापडले आठशे बिफिकीर !

 



पंढरपूर : पंढरपूर पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेत दोन दिवसात आठशे बेफिकीर लोक सापडले आणि पोलिसांनी त्यांना चांगलाच फटकाही लगावला आहे.


दोन वर्षापासून कोरोनाचे आक्रमण झाले असून या कोरोनाने प्रचंड नुकसान केले आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने विध्वंस केला आहे. जवळच्या अनेक माणसाना, नातेवाईकांना शेवटचा निरोप द्यावा लागला आहे तर कित्येक कुटुंबातील कर्ते पुरुष या कोरोनाने हिरावून नेले आहेत. एवढा विनाश केलेला असतानाही अनेक लोक अजूनही गंभीर नाहीत आणि घातक कोरोनाला गंभीरपणे घेताना दिसत नाहीत. शासन आणि प्रशासन नियमावली आखून देत आहे पण माहित असूनही या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. अकारण गर्दी करणारे अनके महाभाग आहेतच पण विनामास्क भटकणारे अनेक बेफिकीर रस्त्यारस्त्यावर दिसत असतात. मास्क असला तरी तो गळ्यात लटकलेला असतो, परस्परांना खेटून गप्पा रंगत असतात. अशी वेफिकीर व्यक्ती ही समाजाचीच शत्रू असते. स्वत:च्या जीवाला धोक्यात टाकतातच पण इतरांच्या जीवावरही संकट आणतात. एक प्रकरे ही मंडळी कोरोनाचे वाहक आणि प्रसारक असतात आणि अशा बेफिकीर मंडळींची संख्याही काही कमी नाही. 


पंढरपूर पोलिसांनी अशा बेफिकीर मंडळीना अक्कल शिकविण्याची मोहीमच हाती घेतली आणि दोन दिवसांत ८०३ बेफिकीर पंढरपूर शहरात पोलिसांना आढळून आले. यात विनामास्क भटकणारे ३८७ आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणारे ४४६ लोक पंढरीत सापडले. या आकडेवारीवरून कोरोनाच्या बाबतीत पंढरपूर किती जागरूक आहे आणि कोरोनाला किती गांभीर्याने घेतले जातेय हेच दिसून येत आहे. पंढरपूर शहरातील या ८०३ बेफिकीर मंडळीवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. तब्बल ४ लाख ७७ हजार रुपयांचा दंड त्यांच्याकडून वसूल करण्यात आला असून ही मोहीम आणखीही सुरूच राहणार आहे. नागरिकांनी कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावेत असे आवाहन प्रश्नाने पुन्हा एकदा केले आहे.        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !