BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ जून, २०२२

सोलापुरात आई बापास फाशीची शिक्षा !



सोलापूर : आपल्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या बापास आणि त्याला मदत करणाऱ्या पिडीत मुलीच्या आईस सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. 


जिल्हा सत्र न्यायालयाने काल सदर दोन्ही आरोपींना दोषी धरले होते आणि आज शिक्षा सुनावली जाणार होती. न्यायालयाने आज ही शिक्षा सुनावली असून मयत अल्पवयीन मुलीच्या पित्याला आणि आईला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ३ जानेवारी २०२२ रोजी सिकंदराबाद येथे आपल्याच अल्पवयीन मुलीवर नराधम बापाने अत्याचार केला होता आणि नंतर तिचा खून केला होता. धोलाराम बिष्णोई याने केलेल्या या कृत्यास त्याची पत्नी पुनिकुमारी बिष्णोई हिने मदत केली होती. (Murder by rape, death sentence by parents) हा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला असून न्यायालयाने या दोघानाही आज फाशीची शिक्षा सुनावली आहे.  


धोलाराम बिष्णोई या नराधम पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीवर तिला दारू पाजून  अनैसर्गिक अत्याचार तर केलाच पण तिचा गळा आवळून खून केला होता. मुलीचा गळा आवळून खून केल्यानंतर मुलीचे प्रेत घेवून ते दोघे सिकंदराबाद - राजकोट एक्सप्रेसने गावी निघाले होते. दरम्यान प्रवाशांना त्यांच्याबाबत काही शंका आली आणि त्यांनी रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली होती. त्यानंतर ४ जानेवारी २२ रोजी सोलापुरात हा गुन्हा दाखल झाला आणि सोलापूर पोलिसांनी याचा तपास केला. हा खटला सोलापुरात जलद न्यायालयात चालला आणि आज शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. काल आरोपी दोषी ठरल्यानंतर त्यांना काय शिक्षा दिली जाणार याची अनेकांना प्रतीक्षा होती. अखेर आज न्यायालयाने आई आणि वडील यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. 


सदर खटल्यात ३१ साक्षी अवघ्या ९ दिवसांत तपासण्यात आल्या. रेल्वेतून पारस करणाऱ्या एक महिलेची नेपाळमधून साक्ष नोंदविण्यात आली. हा गुन्हा अत्यंत क्रूर आणि गंभीर असल्याने आरोपींना कसलीही दया दाखविण्यात येवू नये असा युक्तिवाद सरकार पक्षाने न्यायालयात केला. सरकार पक्षाचा हा युक्तिवाद न्यायालयाने मान्य करीत दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. फाशीची शिक्षा खूप क्वचित होते आणि त्यासाठी घडलेला गुन्हा हा दुर्मिळात दुर्मिळ असावा लागतो. न्यायालयाने या खटल्यात अपवादातही अपवादात्मक मानून हा निकाल दिला आहे. 

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !